आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुख्‍यमंत्र्याची प्रेम कहानी फुलली हॉटेलमध्‍ये, कधीकाळी चित्रपटातही नशिब आजमावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू-कश्‍मीरमध्‍ये थंडीच्‍या दिवसात विधानसभा निवडणूकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. या वेळी मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेण्‍याची संधी कोणाला मिळणार याविषयी चर्चा झडत आहे. याबरोबच कोणाचे करियर संपणार याचे आडाखे बांधले जात आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला जम्मू- कश्‍मीरच्‍या राजकीय पटलावर अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्‍या मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्‍या विषयी माहिती देणार आहोत.
जम्मू-कश्‍मीरचे मुख्‍यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा जन्‍म 10 मार्च 1970 मध्‍ये झाला. बर्न हायस्‍कूल श्रीनगर आणि लॉरेन्‍स स्‍कूलमध्‍ये शालेय शिक्षण पूर्ण झाले. बी. कॉम करण्‍यासाठी ओमर अब्दुल्ला यांनी मुंबईच्‍या सिडेनहॅम कॉलेजमध्‍ये प्रवेश घेतला. मात्र काही कारणामुळे त्‍यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. अपूर्व लखीया यांच्‍या 'मिशन अस्‍तांबुल' या चित्रटात ओमर अब्दुल्ला यांचा चेहरा छळकला. या चित्रपटात ओमर यांनी रियल लाईफ कॅरेक्टरचा रोल केला.
हॉटेलमध्‍ये सुरू झाली LOVE STORY
ओमर अब्दुल्ला यांनी सिख परिवारातील पायल नाथ या मुलीसोबत 1994 मध्‍ये लग्‍न केले. पायलचे वडील रामनाथ सेना हे रिटायर्ड मेजर आहेत. लग्‍ना आगोदर पायल आणि ओमर यांची भेट दिल्लीच्‍या हॉटेल ओबेरॉयमध्‍ये झाली. यावेळी दोघेही हा हॉटेलात काम करत होते. या दोघांना जहिर आणि जमीर नावाची दोन मुले आहेत. 2011 मध्‍ये पायल आणि ओमर यांचा डिव्‍हर्स झाला. याची माहिती स्‍वत: ओमर अब्दुल्ला यांनी दिली होती. पायल आपल्‍या दोन मुलांसोबत दिल्लीमध्‍ये राहात आहे.
28 व्‍या वर्षी झाले आमदार-
1998 मध्‍ये ओमर अब्दुल्ला वयाच्‍या 28 व्‍या वर्षी आमदार म्‍हणून निवडून आले. 1998-99 मध्‍ये पर्यंटन आणि परिवहन मंत्रालयाचे सदस्‍य म्‍हणून काम पाहिले. 1999 मध्‍ये 13 व्‍या लोकसभेवर खासदार म्‍हणून निवडणूक लढवली. केंद्रीय मंत्रीमंडळात (वाणिज्‍य आणि उद्योग) मंत्री म्‍हणून शपथ घेतली. 5 जानेवारी 2009 मध्‍ये ओमर अब्बदुल्ला यांनी जम्मू-कश्‍मीरचे मुख्‍यंमत्री पदाची शपथ घेतली.
पुढील स्‍लाईडवर पाहा ओमर यांची फोटो...