आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jammu And Kashmir Floods: Struggle For Relief Continues

स्वर्गावर आपत्ती : देशात सर्वात मोठी बचाव मोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवाईदल असो की लष्कराचे वैमानिक... काश्मीरमधील आपद्ग्रस्तांना वाचवण्याची मोहीम सकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत चालते. १० दिवसांपासून हे अभियान अव्याहत सुरू आहे. गोठ्यांपासून, घरे, छतापर्यंत बचाव कार्य ...
फिलिप्स जोएबी/ नरहरी व्ही. वैमानिक, चित्ता हेलिकॉप्टर
रविवारी मोहिमेसाठी मंडाल भागात गेलो होतो. तेथून एका गरोदर महिलेला सुरक्षितस्थळी हलवायचे होते. तिला प्रचंड वेदना होत होत्या. नातेवाईकांचा मदतीसाठी धावा सुरू होता. आम्हाला उतरण्यासाठी जागा मिळत नव्हती. वादळी पाऊस सुरू होता. महिलेच्या वेदना आम्हाला पाहवल्या नाहीत. यानंतर सर्व काही देवाच्या भरवशावर सोडून उतरण्याचा निर्णय घेतला. एका छोट्या पायवाटेवर हेलिकॉप्टर उतरवले. ही जागा तावी नदीच्या किनाऱ्यावर होती. ही महिला आिण तिच्या नातेवाइकांना घेऊन केलेले हे उड्डाण मी जीवनात कधीही विसरू शकणार नाही.

अजित सिंह/शिव किरण वैमानिक, ध्रुव हेलिकॉप्टर
"भास्कर'प्रतिनिधी गोविंद चौहान यांना दोन्ही वैमानिकांनी मोहिमेची माहिती दिली. ती त्यांच्याच शब्दांत...उत्तराखंडमधील मोहिमेत काम केलेले हे वैमानिक म्हणाले, येथे दिवसभर पाऊस थांबला आहे. मात्र, भांबावलेल्या लोकांमुळे आमच्यासमोर एक आव्हान आहे. पुरात अडकलेल्यांना आम्ही सुरक्षितस्थळी हलवतो तेव्हा अनेकदा आम्हीच संकटात सापडतो. लोक घेरतात, दोरीवर लटकतात. मग हेलिकॉप्टरमधील एका व्यक्तीला उतरवून इतरांना समजावून सांगावे लागते. काही खोडसाळ लोक दगडफेकही करतात.

फ्लाइट लेफ्टनंट सनी गर्ग- वैमानिक, एएन-३२ विमान
भटिंड्यात राहणारे सनी आठवड्यापासून काश्मीरच्या बचाव कार्यात सहभागी आहेत. श्रीनगरमधून लोकांना हलवणे आणि जम्मू दिल्लीतून मदत सामग्री आणण्याच्या कामात गुंतले आहेत. दररोज कमीत कमी फेऱ्यांतून २०० लोकांना वाचवले जाते. आठवडाभरात ५० फेऱ्या झाल्या आहेत. ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी एक महिला दिल्लीला जाणार होती. विमान उड्डाण लांबले तेव्हा ती अस्वस्थ झाली. चालकदलाशी ती हुज्जत घालू लागली. येथून लवकर काढा, म्हणत रडू लागली. हे लोक खूप अडचणीत आहेत.