आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-पीडीपीचे जुळेना, भाजपसोबत गेल्यास पीडीपीचे भविष्य अंधारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेवरून तिढा कायम आहे. पीडीपी आणि भाजपा मिळून सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. परंतु पीडीपीमध्ये यावरून तीव्र मतभेद दिसून येत आहेत. पक्षाचे काही नवनिर्वाचित आमदारांनी त्याबद्दल नाराजी मांडली. भाजपसोबत गेल्यास राज्यातील जनतेचे समर्थन संपुष्टात येईल आणि पक्षाचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती या आमदारांनी व्यक्त केली आहे.
पीडीपी नेतृत्वाने आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन लोकांची मते आजमावून पाहण्याची सूचना केली होती. त्यावर पीडीपीचे एक नेता म्हणाले, भाजपसोबत सरकार बनवण्यासाठी युती करण्यात आल्यास त्यावरून पक्षाची हानी होऊ शकते, असे मत घेऊन काही आमदारांनी भूमिका मांडली आहे. कलम ३७०, सशस्त्र दल विशेषाधिकारी कायदा हटवण्याच्या मुद्द्यावर भाजचा आपला अजेंडा आहे. दुसरीकडे पीडीपीच्या २८ पैकी केवळ एका आमदाराने आघाडीला विरोध केला आहे, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
भाजपची दिल्लीत बैठक : राज्यातआघाडी सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला असून रणनिती ठरवण्यासाठी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली आहे. जम्मूतील तीन खासदारांना प्रदेश अध्यक्ष यांना दिल्लीत बोलावण्यात आल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. बैठकीनंतर राज्यात आघाडीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल.