आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज ठाकरे म्हणाले - महाराष्ट्रात मोगलाई, मांसविक्रेत्यांना मनसे सुरक्षा देणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/श्रीनगर/जयपूर -मुंबई पाठोपाठ आता राजस्थान सरकारने तीन दिवसांसाठी \'मीटबॅन\' केले आहे. राजस्थानने 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान मांस विक्रीवर बंदी घातली आहे. दरम्यान मुंबईत चार दिवसांच्या मांसविक्री बंदीविरोधात राजकारण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि परिसरातील मांसविक्री बंदीला विरोध केला आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात कोणी काय करायचे हे आता जैनांनी ठरवायचे का ? असा सवाल त्यांनी केला आहे.
राज ठाकरे म्हणाले, \'जर जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वात मांसखाण्यावर बंदी घातली जात असेल तर मग श्रावण आणि गणपतीतपण करणार का?\' मुंबई महापालिकेने घातलेल्या बंदीला विरोध करत बंदी काळात मांसविक्री करणाऱ्या विक्रेत्यांना मनसे संरक्षण पुरवेल.

राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) रस्त्यावर उतरली आहे. मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि कार्यकर्त्यांनी दादरमधील मुख्य बाजारात चिकन विक्रीचा स्टॉल सुरु केला आहे. तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी \'कोणत्याही धर्माची आमच्यावर सक्ती सहन केली जाणार नाही. चार दिवस मांसविक्रीवरील बंदी मान्य नाही,\' असे म्हटले आहे. दुसरीकडे मुंबईतील मांस-मटन विक्रेत्यांनी मुंबई हायकोर्टात या बंदीला आव्हान दिले आहे. त्यांच्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये बीफ बंदी
जम्मू-काश्मीरमध्ये बीफ (गोमांस) खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. हायकोर्टाने पोलिसांना आदेश दिला आहे की निर्णयाची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. एका जनहित याचिकेच्या सुनावणीवर हायकोर्टाने बुधवारी हा निर्णय दिला आहे. कोर्टाने काश्मीरच्या विभागीय आयुक्तांनाही अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
 
काय आहे आदेश ?
गोहत्येच्या विरोधात दाखल जनहित याचिकेत हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने मान्य  केले की पोलिसांनी खोऱ्यात गोहत्या आणि मांस तस्करीविरोधात कोणतीही कठोर कारवाई केलेली नाही.
 
सध्या कोणकोणत्या राज्यात आहे बंदी ?
जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगाना, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आसाम आणि आंध्र प्रदेशात गोमांस खाण्यावर बंदी आहे. यापैकी काही राज्यांमध्ये म्हैस आणि बैलाच्या मांसावरही बंदी आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोणत्या राज्यात बंदी नाही