बट्टल बलियन (उधमपूर) - जम्मू-काश्मीरमधील जनतेने लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास व्यक्त करताना मतदानाच्या माध्यमातून बंदुकीच्या दहशतीवर मात केली आहे, असे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्यात दुसर्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराला शुक्रवारी सुरुवात झाली. त्या वेळी ते बोलत होते.
सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पीडीपी यांच्या सरकारांनी आतापर्यंत राज्याला लुबाडले आहे. गेल्या तीस वर्षांत राज्याचा विकास खुंटला आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचारही वाढला आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणुकीवर बंदी आणण्याची भाषा केली जात आहे. परंतु पहिल्या टप्प्यातील मतदानाचा टक्का अतिशय आशादायी आहे. त्यातून जनतेचा लोकशाहीवरील विश्वास दिसून आला आहे.