आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jammu And Kashmir: Three Policemen Killed, One Injured In Firing

काश्मिरात तीन पोलिस शहीद, अतिरेकी पळाले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीरमध्ये सोमवारी सलग चार तास तीन अतिरेकी हल्ले झाले. यामध्ये तीन नि:शस्त्र पोलिस शहीद झाले. एक उपनिरीक्षक आणि एक पूर्वाश्रमीचा अतिरेकीही जखमी झाला. त्याला खबर्‍या असण्याच्या संशयावरून गोळी झाडण्यात आली. पोलिसांच्या धाडसत्रात अतिरेक्यांचा ठावठिकाणा लागला नाही. संपूर्ण काश्मीरमध्ये अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

शोपियाँ जिल्ह्यातील आशिपोरामध्ये दुपारी अतिरेक्यांनी पोलिस पथक बेसावध असताना हल्ला केला. यामध्ये तीन नि:शस्त्र पोलिस शहीद झाले. तिघेजण एका जमीन प्रकरणाची चौकशी करून परतत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्याआधी बारामुल्ला जिल्ह्याच्या पट्टन भागात बसमधून जाताना एका उपनिरीक्षकाला दोन अतिरेक्यांनी गोळ्या झाडून जखमी केले. हल्ल्यानंतर दोघे पसार झाले. अतिरेक्यांनी तिसरा हल्ला पुलवामा जिल्ह्याच्या तराल गावात बँकेबाहेर उभा असलेला पूर्वाश्रमीचा अतिरेकी रफिक अहमदवर हल्ला केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हल्ल्याची चौकशी सुरू
काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक एसजेएम जिलानी म्हणाले, तीन हल्ल्यांची चौकशी केली जात आहे. एकाच गटाने नियोजनपूर्वक तिन्ही हल्ले केले असावेत हे सांगणे कठीण आहे.

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाक रेंजर्सनी नवापिंड फॉरवर्ड बेल्ट,तसेच आरएसपुरा भागात रविवारी रात्री गोळीबार केल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍याने सांगितले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

सईद आले, हल्ले प्रचंड वाढले
सईद सरकार स्थापन झाल्यापासून काश्मीरमध्ये हल्ले व घुखोरीचे प्रकार प्रचंड वाढले आहे. या काळात ८ जवान शहीद झाले असून दोन नागरिकही मारले गेले आहेत. एका अधिकार्‍यासह २० जण जखमी झाले आहे. यादरम्यान कारवाईत केवळ ४ अतिरेकी मारले गेले.

(फोटो : जखमी जवानांना रुग्णालयात हलवताना सुरक्षा अधिकारी.)