आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, अंगावर काटा आणणारे काश्मिरमधील PHOTO; गर्भवतीला वाचवण्यासाठी, पगडंडीवर उतरवले हेलिकॉप्टर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कश्मीरची परिस्थिती आणि लष्करांच्या प्रयत्नांना दर्शवणारा हा फोटो)

जम्मू - एअरफोर्स असो अथवा आर्मीचे पायलट. जम्मू-काश्मीरमध्ये मागील दहा दिवसांपासून आपला जीव धोक्यात टाकून ते लोकांना वाचवत आहेत. Divyamarathi.com सोबत बोलताना त्यांनी सांगितले काही महत्त्वाचे मिशन ज्यांना ते कधीच नाही विसरू शकणार...

फिलिप्स जोएबी/नरहरी वी पायलट, चीता हेलिकॉप्टर
6 सप्टेंबरला बचाव ऑपरेशनसाठी आम्ही मंडाल भागात गेलो होतो. एका गर्भवती महिलेला शिफ्ट करायचे होते. ती वेदनेने कन्हत होती, तर तिचे कुटुंबीय मदतीसाठी आरडोओरडा करत होते. आम्हाला लँड करण्यासाठी कुठेच जागा सापडत नव्हती. सर्वत्र धूर आणि पाऊस. मात्र त्या महिलेच्या वेदना आम्हाला स्वस्थ बसू देईनात. आम्ही सर्व काही देवाच्या भरवश्यावर सोडले आणि एका छोट्याशा पगडंडीवर हेलिकॉप्टर उतरवले. जवळच तावीचे पाणी जोराने वाहात होते. त्यांनंतर आम्ही पटकन त्या महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना हेलिकॉप्टरमध्ये बसवले आणि उड्डाण केले. तो क्षण आम्ही कधीच विसरू शकणार नाही.
अजीत सिंह/शिव किरण पायलट, ध्रुव हेलिकॉप्टर
तीन दिवसांपर्वीची घटना आहे. त्या ठिकाणाबद्दल निट आठवत नाही, मात्र श्रीनगरच्या एका घराच्या छतावर लोकांची गर्दी होती. आम्ही दोरी सोडून लोकांना हेलिकॉप्टरमध्ये घेत होतो. तेव्हा त्या दोरीला एका व्यक्तीसोबत अनेक जण लटकले. त्यामुळे असे वाटायला लागले की, हे लोकं तरी पडतील नाही तर हेलिकॉप्टर आपल्या बॅलेंसवरून हटेल. तेव्हा एका व्यक्तीला हेलिकॉप्टरमधून खाली उतरवले आणि लोकांना समजावले. त्यानंतर एक-एक करत सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. या दरम्यान काही लोकांनी दगडफेकही केली. अशा वेळी आम्हाला स्वतःपेक्षा जास्त हेलिकॉप्टरची आणि त्यामध्ये बसलेल्या लोकांची चिंता होती.

विंग कमांडर अनूप शर्मा- पायलट, एमआई-17 हेलिकॉप्टर
5 सप्टेंबरला पाकिस्तान सीमेवर बीएसएफचे 23 जवान अडकले होते. त्यांची चौकी वाहून गेली होती. तेथे जवळूनच तावी नदी वाहात होती. आसपास सर्व झाडी असल्याने हेलिकॉप्टरला 60 फुट उंचीवर नेण्यात आले, मात्र तेथे हेलिकॉप्टर स्थिर ठेवण्यास अवघड व्हायला लागेत. एवढेच नाही तर, जर आम्ही एक मीटरसुध्दा पुढे गेलो असतो तर पाकिस्तानची बॉर्डर लागली असती. पूरामुळे बॉर्डरही दिसत नव्हती. जवानांना दोरीपर्यंत पोहोचवण्यासाठी नदीत उडी मारावी लागणार होती. जोरदार हवेमुळे दोरीसुध्दा इकडे तिकडे उडत होती. एक जवान अर्धा रस्त्यापर्यंत येऊन पुन्हा उतरायला लागला. त्याला ओढून वर घ्यावे लागले. 4-5 जवानांना एकाच वेळेस वर ओढत होतो. ते दीड तास अत्यंत भयावह आणि आव्हानात्मक होते आमच्यासाठी. बिहारमध्ये कोसी आणि ओडीसामध्ये आलेल्या वादळापेक्षाही ही घटना जास्त अवघड होती.
पुढील स्लाईडवर पाहा, कश्मीरच्या पूरामुळे उधवस्त झालेल्या काश्मिरचे तसेच हेलिकॉप्टरने वाचवण्यात आलेल्या लोकांचे फोटो...