आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jammu Floods News In Marathi, Divya Marathi, Indian Army

जम्मूत पंधरा दिवसांत अडीच लाख लोकांचे प्राण वाचले, लष्कराचे मोहीम सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - गेल्या १५ दिवसांपासून पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याच्या लष्करी मोहिमेला चांगले यश आले आहे. आतापर्यंत सुमारे २ लाख ३७ हजार नागरिकांचे प्राण वाचले, तर ७५ हजार नागरिकांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

एनडीआरएफ आणि लष्कराने पूरग्रस्त राज्यातील वेगवेगळ्या भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्याचबरोबर ३ हजार ८८७ टन एवढे मदत साहित्याचेही प्रदेशात वाटप करण्यात आल्याची माहिती संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी कर्नल एस.डी. गोस्वामी यांनी मंगळवारी िदली.

१३ िदवसांनंतर महामार्ग खुला
जम्मू-श्रीनगर महामार्ग मंगळवारी सकाळी १३ दिवसांनंतर पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यात झालेल्या तुफान पावसामुळे महापूर आला होता. जम्मू-श्रीनगर महामार्गही ४ सप्टेंबरपासून अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने बंद होता. काश्मीर खोऱ्याला जोडणारा हा एकमेव मार्ग असल्याने, महामार्ग सुरू करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते. भारतीय लष्कराच्या सीमा रस्ते संस्थेने दरड हटवणि्याचे काम केले व रस्ता पुन्हा सुरू केला. महामार्ग पुन्हा सुरू झाल्याने पूरग्रस्त भागात मदत पोचवणि्यास फायदा होणार आहे.