आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर : एन्काउंटरमध्ये मारला गेला मसूद अझहरचा पुतण्या, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका घरातून झालेल्या फायरींगनंतर सिक्युरिटी फोर्स आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. - Divya Marathi
एका घरातून झालेल्या फायरींगनंतर सिक्युरिटी फोर्स आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.
श्रीनगर - काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सोमवारी झालेल्या एन्काऊंटरमध्ये तीन दहशतवादी मारले गेले होते. त्यापैकी एक तल्हा राशीद हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या  मसूद अझहरचा पुतण्या होता. जैशच्या प्रवक्त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. या एन्काऊंटरमध्ये लष्कराचा एक जवानही शहीद झाला. तर एक सामान्य नागरीक जखमी झाला होता. 
 
 
- जैशच्या प्रवक्त्याच्या माहितीनुसार मारल्या गेलेल्या इतर दोन दहशतवाद्यांचे नाव मोहम्मद भाई आणि वसीम आहे. 
- मोहम्मद भाई जैशचा डिव्हीजनल कमांडर होता. तो काश्मीरचा राहणारा नव्हता. तर वसीम पुलवामाच्या द्रुबगामचा होता. 

गुप्त माहितीवरून केली कारवाई 
- संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, हे एन्काऊंटर गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आले होते. त्यात आर्मी, सीआरपीएफ आणि  पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा समावेश होता. 
- फोर्सने जिल्ह्याच्या कांडी अलगार मध्ये शोध घ्यायला सुरुवात केली. सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी या भागाकडे मोर्चा वळवला त्यावेळे लपलेल्या दहशतवाद्यांनी ऑटोमॅटिक वेपन्सद्वारे फायरिंग सुरू केले. सिक्युरिटी फोर्सने प्रत्युत्तराच्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 
- त्यांनी सांगितले की, एन्काऊंटरमध्ये लष्कराचा एक जवानही शहीद झाला. घटनास्थळाहून 2 एके 47 रायफल आणि एक पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. 

स्थानिकांनी केला होता विरोध 
- राज्याचे डीजीपी एसपी वैद्य यांनी सांगितले की, या परिसरातील लोकांनी सिक्युरिटी फोर्सेसच्या कारवाईचा विरोध केला. त्यामुळे जोरदार चकमक झाली. त्यात एख नागरीकही जखमी झाला. तो श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...