आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jammu Kashmir Facing Worst Flood In 60 Years Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीरमध्ये पुराने हाहाकार, २०० ठार; २५०० गावांत पुराचे पाणी शिरले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू / श्रीनगर - पृथ्वीवरील स्वर्ग असा लौकिक असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये सलग सहाव्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती हाताबाहेर गेली आहे. शनिवारी अनेक भागांत घरे कोसळून २४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २०० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात बचाव कामासाठी आलेले लष्कराचे ९ जवान वाहून गेले. त्यातील सात जणांना वाचवण्यात यश मिळाले. मात्र, अजूनही दोघे बेपत्ता आहेत.

गेल्या वर्षी उत्तराखंडची जशी स्थिती होती तशी स्थिती आता जम्मू-काश्मीरची झाली आहे, असे लष्कराचे म्हणणे आहे. जम्मू-काश्मीर सरकारने पूर ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राज्याचा दौरा केला. अशी आपत्ती आपण कधीही पाहिली नाही, अशी टिप्पणी त्यांनी राज्यातून परतल्यानंतर केली. त्यांनी राज्याला सर्वतोपरी मदत देण्याचा विश्वास िदला आहे.
परिस्थिती िबकट
नद्या अक्राळ-विक्राळ झेलम, चिनाब, तावी आणि अखनूर यांसह सर्व नद्यांना पूर. तावी नदीवरील पूल वाहून गेला. इतर पूलही वाहतुकीसाठी बंद.
रेल्वे- हवाई सेवा ठप्प जम्मूत उधमपूर, रामनगर, रखबटलासह अनेक ठिकाणी घरे कोसळली. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश.
यात्रा खोळंबली
४० हजार यात्रेकरूंची दैना वैष्णोदेवी यात्रा तिसऱ्या दिवशीही खोळंबली. कटरामध्ये अजूनही ४० हजार यात्रेकरू अडकून पडलेले आहेत.
लष्कराची मदत काश्मीरच्या पुलवामात लष्कराची बोट उलटली. बारामुल्लात लष्कर आणि बीएसएफचे ५० जवान अडकले.
अतिवृष्टीचा इशारा : काश्मीर खोऱ्यात आणखी तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

वऱ्हाडाच्या बसमधून ५० मृतदेह काढले
राजौरीच्या नौशहरात गुरुवारी नाल्यात वऱ्हाडाच्या बसमधून वाहून गेलेल्या ५० जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यात नवरदेवाचाही समावेश आहे. इतर मृतदेहांचा शोध सुरू आहे. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात प्रचंड अडचणी येत आहेत.

(छायाचित्र : तवी नदीचे हे दृष्य. या नदीवरील पुल तुटले आहेत. यामुळे जम्मूचा पंजाबशी संपर्क तुटला आहे. )

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पृथ्वीवरील स्वर्गावर पावसाच कहर