आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jammu Kashmir Flood: Heartbreaking Stories Reveal Extent Of Damage

जम्‍मू-कश्‍मीर: मृतावस्थेत सापडले मायलेक, लग्न वेशभुषेत आढळली मृत नववधू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: श्रीनगरमध्ये एका पूरग्रस्ताला वाचवताना लष्कराचा जवान)

जम्‍मू- कश्‍मीरमधील काही भागांतून पूराचे साचलेले पाणी ओसरत आहे. परंतु काही भागांत अजून पूरस्थिती कायम आहे. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. पाण्याबाहेर मृतदेह काढण्यात येत आहेत. एका ठिकाणी मृतावस्थेत मायलेकाचा मृतदेह आढळून आला आहे. महिलेच्या पाठीवर चिमुरड्याचा मृतदेह बांधलेल्या होता, असे बचाव पथकाने सांगितले आहे. तर दुसरीकडे विवाहाच्या जोड्यातच एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. त‍िच्याच्या हातावर मेंदी काढलेली होती.

मेंदीच्या रात्रीच पती बेपत्ता...
श्रीनगरचे पत्रकार सुजात बुखारी यांनी सांगितले की, जवाहर नगरातील एका तरुण विवाहाच्या आदल्या दिवशीच बेपत्ता झाला आहे. बेपत्ता तरुणाची वाट पाहात भावी पत्नीच्या हातावरील मेंदीही फिकी पडली आहे.

सनातनगर भागातील मदत शिबिरात राहात असलेल्या अहमद यांनी सांगितले की, पूरातून बचावलेले एक जोडपे आपापसात भांडत होते. दोघांचा एकुलता मुलगा बेपत्ता झाल्याने दोन्ही दुःखी होते. दोघे एकमेंकांवर चिमुरड्याला पूरात सोडल्याचा आरोपही करत होते. त्यांची अवस्था पाहिली जात नसल्याचे अहमद यांनी सांग‍ितले.

मृतावस्थेत आढळले मायलेक, पाठीला बांधलेला होता मृतदेह...
विवाहाच्या वेशभुषेत एका नववधुचा मृतदेह सापडल्याचे बचाव पथकाने सांगितले. तसेच मृतावस्थेत मायलेक आढळले आहे. आईच्या पाठीला चिमुरड्याला बाधले होते.

कुलगामममध्ये एका मुलाला वाचवण्‍यात यश आले आहे. परंतु हा मुलाची वाच्या गेली आहे. अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अजून अनेक गावांमध्ये बचव पथक पोहोचलेले नाही.

वडीलांच्या औषधासाठी मुलाने लावली प्राणाची बाजी...
डायबिटीज असलेल्या वडीलांच्या इन्सूलिन आणण्‍यासाठी एका मुलाने प्राणाची बाजी लावल्याची घटना सोलिना भागात घडली आहे. वडीलांना घराच्या छतावर झोपवून हा मुलगा स्वत: पूराच्या पाण्यात औषधी आणण्यासाठी गेला होता. तो नंतर परतलाच नाही.

पत्रकाराने वाचवले 300 लोकांचे प्राण...
श्रीनगरचे पत्रकार रिफात अब्‍दुल्‍ला यांनी स्वत:चा प्राण धोक्यात टाकून जवळपास 300 पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. शहरातील राजबाग भागात पुराचे पाणी शिरले तेव्हा अब्‍दुल्‍ला घराच्या चौथ्या मजल्यावर होते. चहुबाजुला पूराने हाहाकार उडाला होता. पाण्याची पातळी वाढतच होती. अब्‍दुल्‍ला यांनी अधिकार्‍यांना फोन केला. परंतु मोबाइल नेटवर्क ठप्प झाले होते.
अब्‍दुल्‍ला यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून स्वत: पूराच्या पाण्यात उडी घेतली. बोटेची व्यवस्था केली. काही स्वयंसेवकांच्या मदतीने शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, सरकारी कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्याचे आदेश....