आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 चित्तथरारक फोटोंमध्ये बघा भारताच्या स्वर्गात जीव वाचवण्यासाठी धडपड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- पूरात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर)
जम्मू- जम्मू आणि काश्मिरमध्ये पूर संकट अधिक गडद झाले आहे. ठिकठिकाणी पूराचे पाणी साचले आहे. यामुळे अनेक नागरिक घरांमध्ये तर काही उंच भागांवर अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी लष्कराकडून व्यापक स्वरुपात अभियान राबविले जात आहे. आतापर्यंत सुमारे 1 लाख 30 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.
पूराच्या पाण्याची पातळी जशी कमी होत आहे तसे मृतदेह पाण्यातून वर येत आहेत. महामारी पसरू नये म्हणून त्यांच्यावर वेळीच अंत्यसंस्कार केले जात आहेत. पूराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना भारतीय लष्कराकडून खाण्याची पाकिटे दिली जात आहेत. घराच्या छतावर अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित स्थळी पोहोचविले जात आहे.
पुढील स्लाईडवर बघा, पूरात सापडलेल्या जम्मू आणि काश्मिरची विदारक छायाचित्रे...