आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी, भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर हायवे केला बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमवृष्टीमुळे अडकलेले ट्रक. - Divya Marathi
हिमवृष्टीमुळे अडकलेले ट्रक.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी, पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्याचा देशाबरोबरचा संपर्क तुटला आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी याठिकाणी जोरदार हिमवृष्टी झाली. जम्मू - श्रीनगर हायवे बंद करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याच्या मते शनिवारी सकाळपर्यंत जवाहर टनलवर 8 इंच बर्फ साचला होता.

हायवेवरील वाहतूक बंद
ऊधमपूरच्या खिरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. तसेच हिमवृष्टीही झाल्याने याठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे जम्मू-श्रीनगर हायवेवरील वाहतूक बंद करावी लागली.

गुरुवारपासून स्थिती गंभीर
- मोठया प्रमाणावर बर्फ पडत असल्याने गुरुवारी श्रीनगर लेह, मुघल रोड आणि सोनमर्ग-गुलमर्ग रोड बंद झाला होता.
- शुक्रवारी रात्रीपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद होती.
- श्रीनगरहून येणार्या गाड्या जवाहर टनलपूर्वीच थांबवण्यात येत आहेत. तर जम्मूहून गाड्यांना पुढे सोडलेच जात नाही आहे. हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
- शुक्रवारी सायंकाळपर्यंत काश्मीरच्या काही भागांमध्ये हिमवर्षाव सुरू होता. हवामान विभागानुसार पुढचे एक-दोन दिवस हवामान खराब राहण्याची शक्यता आहे.
- राज्याच्या काही भागांमध्ये शनिवारी सकाळी पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTOS
बातम्या आणखी आहेत...