आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मिरात दुसऱ्या दिवशीही महामार्ग बंद, शेकडो वाहने फसली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 जम्मू- जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग सलग दुसऱ्या दिवशीही बंद राहीला. महामार्गावर फसलेल्या १०६ लहान वाहनांना बाजूला काढून श्रीनगरकडे रवाना करण्यात आले. मोठ्या वाहनांना अद्यापही महामार्गावरून काढण्यात आलेले नाहीये. 
 
ज्या कारणाने काश्मीरकडे जाणारे पुरवठ्याचे माल ट्रक फसलेले आहेत. वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हवामान स्वच्छ राहील्यास बुधवारी एका बाजूने वाहनांसाठी रस्ता खुला केला जाईल.
 
रविवारी रात्री जोरदार पावसानंतर महामार्ग बंद झाला होता. ज्यात शेकडो लहान मोठी वाहने फसली होती. सोमवारी महामार्गाला ठीक करण्याचे काम जारी राहील. पण रात्री पुन्हा जोरदार पावसामुळे डोंगरावरील मोठा माती दगडांचा राडारोडा दरडी कोसळून महामार्गावर दगडमाती येऊन रस्ता साफ करण्याचे काम पुन्हा बंद झाले होते.
 
मंगळवारी पूर्ण दिवसभर महामार्गास ठीक करण्याचे काम सुरुच होते. दुपारी जवळपास तीन वाकता फसलेल्या लहान वाहनांना काढून काश्मीरच्या बाजूनं रवाना करण्यात आले. पण दोन्ही बाजूने आलेली ताज्या वाहनांच्या गर्दिस महामार्गावर येऊ दिले गेले नाही. फक्त फसलेल्या लहान वाहनांनाच काढण्यात यश आले. 
बातम्या आणखी आहेत...