आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदला घेण्यासाठी पोलिस ठाण्यावर हल्ला, 6 जवान शहीद, मृतदेहांचे चेहरे केले विद्रूप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- काश्मीरमधील बिजबहेडा, अरवनी परिसरात झालेल्या चकमकीत लष्कर तोयबाचा मोस्ट वाँटेड दहशतवादी जुनैद मुट्टूसहित तीन दहशतवादी ठार झाले. मुट्टूवर 10 लाखांचे बक्षीस होते. त्यातील फक्त एकाचाच मृतदेह सापडला होता. चकमकीत दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात दोन नागरिकांनादेखील प्राण गमवावे लागले. काल (शुक्रवारी) झालेल्या या प्रतिहल्ल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांनी काही तासांतच पोलिस दलावर हल्ला केला. त्यात 6 जवान शहीद झाले.

चकमकी दरम्यान जवानांवर दगडफेक
मुट्टू 20 वर्ष काश्मीरमध्ये सक्रिय होता. शुक्रवारी सकाळी वाजता अरवनीत त्याला सुरक्षा दलांनी घेरले. 10  वाजता तो लपलेल्या घरातून गोळीबार सुरू झाला. जवानांनी त्याला प्रत्युत्तर देताच त्यांच्यावर तरुणांनी दगडफेक सुरू केली. या धुमश्चक्रीत दोन नागरिक ठार झाले. पॅलेट गनचे छर्रे लागून 10 जखमी झाले.

20 किलोमीटरवर असलल्या अनंतनाग जिल्ह्यातील अचबल येथे पोलिसांवर करण्यात आलेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पहिले सर्वांना घेरुन त्यांची शस्त्रे काढून घेतली. पोलिसांना त्यांच्याच अॅसॉल्ट रायफलने गोळ्या घातल्या. नंतर सर्व मृतदेहांचे चेहरेदेखील विद्रूप करण्यात आले. नंतर पोलिसांकडील सर्व शस्त्रे काढून घेत पलायन केले. एचएसओ फिरोझ अहमद, कॉन्स्टेबल शारिक अहमद, तन्वीर अहमद, शीराज अहमद, आसिफ अहमद आणि सब्जार अहमद अशी त्यांची नावे असून ते ड्युटी संपवून जीपने अनंतनागहून परतत होते. त्यांची गाडी बुलेटप्रूफ देखील नव्हती.

एलओेसीवर गोळीबारात जवान शहीद : प्रत्यक्षनियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पहाटे सव्वा 5 वाजता झालेल्या गोळीबारात नायक बख्तावर सिंह गंभीर जखमी झाला होता. लष्करी इस्पितळात उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी दिली.
श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत तरुण ठार : लष्करच्या दहशतवाद्यांना मारल्यानंतर काश्मीरमध्ये ठिकठिकाणी तरुणांनी जवानांवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या. त्यांना पांगविण्यासाठी केलेल्या गाेळीबारत जखमी झालेला 22 वर्षीय नासीर अहमद याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...