आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरी मुलीच्या प्रेमात पडल्यानंतर संदीप शर्माने स्वीकारला मुस्लिम धर्म, असे आहे संपूर्ण प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुझफ्फरनगर - जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अटक केलेला लष्कर-ए-तोयबाचा संशयित दहशतवादी संदीप शर्मा ऊर्फ आदिल याच्याबाबत नवा खुलासा झाला आहे. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दिलेल्या माहितीनुसार, एका काश्मिरी मुलीच्या प्रेमात पडल्यानंतर संदीपने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. त्याने त्या मुलीशी लग्नही केले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे. सध्या तरी याबाबतचे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.  
 
दुसरीकडे, संदीपचा भाऊ प्रवीण याने सांगितले की, ‘संदीपने धर्म परिवर्तन केल्याची माहिती मलाही दूरचित्रवाणीवरील बातम्यांद्वारेच कळली आहे. संदीप काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात काश्मीरला गेला होता. तेथे त्याचे एका काश्मिरी मुलीवर प्रेम जडले. त्याने तिच्याशी लग्न केल्यानंतर आपला धर्म बदलून मुस्लिम धर्म स्वीकारला. 
 
मतदार ओळखपत्र घेण्यासाठी एकदा तो घरी आला होता. तो देशाचा शत्रू आहे, मग तो माझा भाऊ कसा होऊ शकतो?’ सूत्रांनी सांगितले की, संदीप पहिल्यापासून गुंड प्रवृत्तीचा होता. त्याने उत्तर प्रदेशमध्येही अनेक गुन्हे केले आहेत. संशयित संदीपने लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून बँक आणि एटीएमही लुटले होते.  
 
संदीपने धर्म बदलल्याचे टीव्हीवरून कळाले : भाऊ प्रवीणची माहिती
संदीपला अटक झाल्यानंतर त्याचा भाऊ प्रवीण शर्मा याने सांगितले की, ‘संदीपचे शिक्षण १० वीपर्यंत झाले आहे. सुमारे ३ वर्षांपूर्वी तो घराबाहेर पडला होता. घर सोडल्यानंतर त्याने धर्म परिवर्तन केल्याची माहिती आम्हाला टीव्हीवरील बातम्यांवरूनच कळली. सध्या तो काय काम करत होता, याची कुठलीही माहिती आम्हाला नव्हती. घर सोडल्यानंतर त्याने आमच्याशी जास्त संपर्कच ठेवला नव्हता. गेल्या ६-७ महिन्यांपासून त्याच्याशी काहीच बोलणे झाले नव्हते. जम्मूत राहून तो दहशतवाद्यांसाठी काम करत होता, ही माहितीही नातेवाइकांना नव्हती. संदीपचे दहशतवाद्यांशी संबंध असले तर आमचे कुटुंबीय त्याला कधीही साथ देणार नाहीत. संदीप दोषी असल्यास पोलिस त्याला जी शिक्षा देतील, ती आम्हाला मान्य असेल. यापुढे कुठल्याही भारतीय नागरिकाने अशा प्रकारच्या कटात सहभागी होण्याचा विचारही करू नये म्हणून त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. 
 
संदीपची कौटुंबिक पृष्ठभूमी 
संदीपच्या वडिलांचे नाव रामकुमार शर्मा असून त्यांचा मृत्यू झाला आहे. संदीपला प्रवीण नावाचा भाऊ असून, तो हरिद्वारमध्ये टॅक्सी चालवतो. आसपासच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, संदीप कमी शिकलेला होता. सुमारे ७-८ वर्षांपूर्वी तो काश्मीरला गेला होता. २०१२ मध्ये तो काश्मीर खोऱ्यात गेला. २०१७ मध्ये तो दहशतवाद्यांच्या गटात सामील झाला. त्याने मानेर शाह आणि शाहिद अहमद यांच्यासोबत एक टोळी बनवली आणि दहशतवाद्यांशी हातमिळ‌वणी केली. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, असे आहे संपूर्ण प्रकरण आणि संदीप दहशतवादी असेल तर शिक्षा व्हावीच: आई
बातम्या आणखी आहेत...