आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jammu Kashmir Minister Booked For Alleged Sexual Assault

जम्मू कश्मीरच्या आरोग्यमंत्र्यांवर महिला डॉक्टरने केला लैंगिक छळाचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू कश्मीरचे आरोग्यमंत्री शब्बीर अहमद खान यांच्यावर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री व राजौरीचे आमदार असलेल्या खान यांच्याविरुद्ध एक महिला डॉक्टरने तक्रार दाखल केली आहे. खान सध्या राजौरीतच आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. या महिला डॉक्टरने तक्रारीत म्हटले आहे, की गेल्या एक आठवड्यापासून खान यांच्या स्टाफकडून सतत मला फोनवरून त्रास देण्यात येत आहे.
या महिलेला मागील आठवड्यात केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या दौ-यात केलेल्या घोषणांबाबत वारंवार माहिती विचारली जात आहे. गुलाब नबी आझाद मागील आठवड्यात याच हॉस्पिटलमध्ये गेले होते जेथे ही महिला डॉक्टर काम करते. महिलेचे म्हणणे आहे, की वरिष्ठ अधिका-यांकडून याबाबतची माहिती घ्यावी असे सांगितले असताना माझ्यावर दवाब आणला जात आहे. 28 जानेवारीला याबाबत मी जेव्हा तक्रार करण्यासाठी खान यांच्याकडे गेली तेव्हा खान यांच्याकडे 10-15 लोक बसले होते. खान यांनी तेथून मला एका छोट्या केबिनमध्ये बोलावले. जेथे त्यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केले. त्यानंतर मी कसेतरी तेथून बाहेर पडले.
याबाबत सांगितले जात आहे, की महिला डॉक्टर ही विभाजनवादी नेत्याची पत्नी आहे. या महिलेच्या तक्रारीनुसार आरोग्यमंत्री अहमद खान यांच्याविरोधात कलम 354 व 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर असोसिएशन ऑफ कश्मीरने या घटनेची चौकशीची मागणी करून आरोग्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेर करण्याची मागणी केली आहे.
पुढे वाचा, कोण आहेत अहमद खान आणि याआधीही अनेक मंत्र्यांवर झाले आहेत आरोप...