आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाँटेड अतिरेक्याऐवजी लावला दुकानदाराचा फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये पोलिसांनी लावलेल्या दोन वाँटेड अतिरेक्यांच्या पोस्टरवर कुपवाड्याच्या एका दुकानदाराचे छायाचित्र असल्याचे आढळून आले. दोन अतिरेक्यांवर प्रत्येकी दहा लाख रुपयांचे इनाम ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात दुकानदार इरफान अहमद शहाने मंगळवारी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून तक्रार नोंदवून जिवाला धोका असल्याचे सांगितले.

सोपोरमध्ये सलग सहा हत्यांनंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे आदेश बजावले होते. यानंतर पोलिसांनी दुसर्‍या दिवशी १६ जून रोजी सोपोरमध्ये ठिकठिकाणी दोन अतिरेक्यांची पोस्टर्स लावली होती. या पोस्टर्सवर अतिरेकी अब्दुल कय्युम नजर तसेच इम्तियाज अहमद कंडू यांची छायाचित्रे होती. दुकानदार इरफान अहमद शहा म्हणाला, त्याचे छायाचित्र गेल्या वर्षी बारामुल्लातील उद्यानात काढले होते. पोलिसांनुसार, दुकानदाराचे छायाचित्र अतिरेकी अब्दुल कय्युमशी मिळतेजुळते आहे. छायाचित्र रंगीत नाही. सोपोर प्रकरणाची चौकशी करणार्‍या पथकाचे प्रमुख बारामुल्लाचे पोलिस महानिरीक्षक गरीब दास यांनी माहिती गोळा करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...