श्रीनगर - जम्मू-काश्मिरात रविवारी सकाळी अचानक पडलेल्या पावसामुळे सुमारे तीन तासांपर्यंत बचावकार्य बंद करण्यात आले. ढग आणि अंधारलेल्या वातावरणामुळे एकाही हेलिकॉप्टरला उड्डाण करता आले नाही. सकाळी ११ वाजता पाऊस थांबल्यानंतर सर्व बचाव पथके पुन्हा कामाला लागली. लष्कराने आतापर्यंत दोन लाख जणांना सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे. दुसरीकडे, सरकारचे प्रशासकीय कामकाज पुन्हा रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. मुख्य सचिव एम.आय. खांडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शक्य तितक्या लवकर कामावर परतण्याचे आवाहन केले आहे.