आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu & Kashmir Pampore Encounter Finally Ends After 56 Hours, All 3 Terrorists Killed

काश्मीरमध्ये 13 वर्षानंतर पहिल्यांदा 56 तास चालले एन्काउंटर, 2 अतिरेकी ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या खोर्‍यात 13 वर्षात पहिल्यांदा तब्बल 56 तास लष्कराचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये चकमक चालली. सर्वात जास्त वेळ चाललेल्या एन्काउंटरला बुधवारी दुपारी पूर्णविराम मिळाला. एन्काउंटरमध्ये आर्मी कमांडोजनी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. या कारवाईत दोन जवान जखमी झाले आहे.

पंपोरमधील एका सरकारी इन्स्टिीट्यूटच्या बिल्डिंगमध्ये सोमवारी सकाळपासून काही अतिरेकी लपून बसले होते. 60 खोल्यांमधून ते जवानांच्या दिशेनेे गोळीबार करत होते.
दरम्यान, 9 महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांनी याच बिल्डिंगवर हल्ला केला होता. काश्मीर खोर्‍यात यापूर्वी 2003 मध्ये सर्वात जास्त वेळ एन्काउंटर चालले होते. श्रीनगरमधील इंदिरा नगरातील कँटोनमेंटमध्ये अतिरेकी घुसले होते. अतिरेकी आणि लष्कराच्या जवानांमध्ये तब्बल 72 तास गोळीबार चालला होता.

-जम्मू-श्रीनगर महामार्गापासून 10 किलोमीटर अंतरावर जम्मू-काश्मीरच्या औद्येगिक विकास संस्थेच्या (जेकेईडीआय) इमारत आहे. कॅम्पसच्या एका बाजूने झेलम नदी वाहते. गुप्तचर संस्थेने सांगितले की, अतिरेकी झेलम नदी ओलांडून आले होते.

- विक्टर फोर्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अशोक नरूला यांनी सांगितले की, 2 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात कमांडोजला यश मिळाले आहे. दोन शस्त्र देखील कमांडोजनी जप्त केली आहेत.
पंपोरच्या सीआरपीएफ जवानांच्या बसवर हल्ला करून जम्मू-काश्मीरच्या औद्येगिक विकास संस्थेच्या (जेकेईडीआय) इमारतीत दडून बसले होते. त्यांच्या विरोधातील मोहिमेदरम्यान लष्कराने इमारतीत स्फोट घडवले होते. मंगळवारी देखील मोठ्या स्फोटांचे आवाज येत होते, परंतु अतिरेक्यांनडून गोळीबार झाला नाही. सुरक्षेमुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय राज्य मार्गावरील पंथा चौक ते पंपोरच्या दिशेने येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. अतिरेक्यांच्या विरोधात लष्कराने एन्काउंटर चालवल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

ड्रोनने पाहिला अतिरेक्याचा मृतदेह
जेईडीआय इमारतीमध्ये कारवाईसाठी लष्कराने ड्रोनची मदत घेतली होती. ड्रोनच्या साह्याने अतिरेक्याचा मृतदेह पाहण्यात आला. इमारत खूप मोठी असल्याने ती स्फोटकांनी उडवून देण्याचा निर्णय लष्कराला टाळावा लागला.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सर्जिकल स्ट्राइकनंतर काश्मीर खोर्‍यात झाले पाच अतिरेकी हल्लेे...
बातम्या आणखी आहेत...