आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jammu Kashmir Railway Inauguration By PM Manmohan Singh

जम्मू-काश्मीरचा संपर्क प्रत्येक मोसमात, देशातील सर्वात मोठ्या रेल्वे बोगद्याचे उद्घाटन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनिहाल - प्रत्येक मोसमात काश्मीर खोर्‍याचा संपर्क जम्मू आणि देशाच्या अन्य भागाशी कायम राहणार आहे. बनिहालपासून काजीगुंडदरम्यान 11 कि.मी. लांब अंतराच्या पंजाल रेल्वे बोगदा सुरू झाल्यामुळे हा संपर्क साधला जाणार आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुधवारी बोगद्याचे उद्घाटन केले. देशातील सर्वांत मोठा व आशियातील तिसरा सर्वात मोठा बोगदा सुरू झाल्यामुळे बनिहाल आणि काजीगुंडदरम्यान 35 कि.मी. अंतर कमी होऊन ते 18 कि.मी. झाले आहे. प्रवासाचा वेळी कमी होणार आहे. बनिहालचे प्रवासी पावणे दोन तासांत श्रीनगरला पोहोचतील. जवाहर बोगद्याच्या रस्त्याने श्रीनगरला पोहोचण्यासाठी सध्या पाच तास लागतात. बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यास हा बोगदा बंद होत होता. यामुळे वाहतूक ठप्प होत होती. बनिहाल रेल्वे बोगद्यामुळे ही अडचण दूर झाली आहे. या निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सिंग म्हणाले, रेल्वे बोगदा सुरू झाल्यामुळे काश्मीरच्या पर्यटनाला चालना मिळेल. तरुणांना रोजगार मिळेल. संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या, रेल्वेमार्ग सुरू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये नवे पर्वाची सुरुवात झाली आहे. न्यू ऑस्ट्रियन बोगदा पद्धतीने बनवलेल्या पीर पंजाल बोगद्यात रेल्वे रुळाच्या बाजूला तीन मीटर रुंद सिमेंटचा रस्ता तयार केला आहे. अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक किलोमीटरवर केबिन आहे.

नव्या रेल्वेतून पंतप्रधानांचा प्रवास
बनिहालपासून बारामुल्लापर्यंत बुधवारी नवी रेल्वे सेवा सुरू झाली. पीर पुंजाल बोगद्यातून पहिल्यांदा धावणार्‍यारेल्वेत पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांनी काजीगुंडपर्यंत प्रवास केला. सामान्य नागरिकांना गुरुवारपासून रेल्वे सेवा उपलब्ध होईल. बनिहाल ते बारामुल्लापर्यंत रेल्वेच्या पाच फेर्‍याहोतील.

युद्धबंदीचे उल्लंघन
जम्मू - पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दौर्‍यादरम्यान बुधवारी पाकिस्तानने दुसर्‍यांदा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. पुंछ जिल्ह्यात सकाळी 10.45 वाजता जवळपास 30 मिनिटे सौदान व डोडा भागात गोळीबार करण्यात आला. यामध्ये कोणताही जवान जखमी झाल्याचे वृत्त नाही. मंगळवारी पुंछमध्ये युद्धबंदीचे उल्लंघन झाले होते.