आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jammu Kashmir: Talks With BJP For Set Up Government Saed

जम्मू-काश्मीर: सरकार स्थापनेसाठी भाजपसोबत चर्चा - सईद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याच्या मुद्द्यावर भाजप आणि पीडीपी यांच्यातील चर्चा अजूनही सुरूच आहे. पीडीपीने शनिवारी या दाव्याची पुष्टी केली आहे. त्याचबरोबर अटी-शर्तींची यादीही तयार करण्यात आली आहे. त्यात लष्कराचा विशेष अधिकार कायदा टप्प्याटप्प्याने रद्द करण्याचाही मुद्दा समाविष्ट आहे.

भाजपसोबत चर्चेची दुसरी फेरी सुरू झाल्याचे पीडीपी नेता मुफ्ती मोहंमद सईद यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही पक्ष किमान समान कार्यक्रम निश्चित करतील. त्यानंतर ठोस चर्चेला सुरुवात झाली आहे. आम्हाला सत्तेची भूक नाही. केवळ राज्याला दलदलीतून बाहेर काढण्याची आपली तळमळ असल्याचे त्या म्हणाल्या. सईद यांचे निकटवर्तीय आमदार हसीब द्राबू यांनी शुक्रवारी राज्यपाल एन.एन. व्होरा यांची भेट घेतली होती. त्याच वेळी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, मेहबूबा मुफ्ती यांची पक्ष प्रमुख म्हणून शनिवारी फेरनिवड करण्यात आली.