आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरातील सखल भागांत 13 दिवसांनीही पाणी साचून, ढिगाऱ्यांखाली सापडताहेत मृतदेह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- 13 दिवसांनीही श्रीनगरमधील काही भागांत पाणी साचून आहे.)
श्रीनगर- शहरातील काही भागांतील पाणी कमी झाले असले तरी काही सखल भागांत अजूनही पाणी साचून राहिले आहे. यामुळे लोकांना घरी परतण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या 13 दिवसांपासून बंद असलेला जम्मू-श्रीनगर हायवे आणि श्रीनगर-बारामुल्ला ट्रेन रुट कालपासून उघडण्यात आला. आता मदतीचे ट्रक सडक मार्गाने थेट श्रीनगरला जात आहेत.
श्रीनगरमधील काही सखल भागांमध्ये असलेले पाणी बाहेर काढण्यासाठी 30 मोटरपंप लावण्यात आले आहेत. जवाहरनगर, लाल चौक, बादामी बाग परिसरात अजूनही पाणी साचले आहे. येथून पाणी काढण्याचे काम सुरू आहे. महामार्ग खुला झाल्याने आता श्रीनगरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना जम्मूत परतणे शक्य होणार आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पूरग्रस्त श्रीनगरची वस्तुस्थिती...