आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jammu Police To Investigate Suspicious Death Of Three Boys In Asaram Ashram

आसारामच्‍या आश्रमात 3 मुलांना केले दफन, जम्‍मू पोलिस करणार चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्‍मू- लैंगिक शोषणाच्‍या आरोपांमध्‍ये तुरुंगात असलेल्‍या आसाराम बापूंविरुद्ध आणखी गंभीर गुन्‍हे दाखल होण्‍याची शक्‍यता आहे. हे प्रकरण जम्‍मू येथील आहे. जम्‍मू येथील आश्रमात 3 मुलांना दफन करण्‍यात आल्‍याचा आरोप असून एका संस्‍थेने यासंदर्भात न्‍यायालयात दाद मागितली आहे.


आसारामचे निकटवर्तीय राहिलेले माजी व्‍यवस्‍थापक भोलानंद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत दावा केला होता, की जम्‍मूती आश्रामात 3 मुलांचा संशयास्‍पद मृत्‍यू झाला होता. या मुलांना आश्राम परिसरातच दफन करण्‍यात आले होते. जम्‍मू येथील आश्रमात मी 7 वर्षे काम केले होते. पोलिसांच्‍या सुरक्षेत मला या आश्रमात नेल्‍यास ती जागा दाखवू शकतो.

भोलानंद यांच्‍या दाव्‍यानंतर जम्‍मूतील एका स्‍वंयंसेवी संस्‍थेने न्‍यायालयात याचिका दाखल करुन प्रकरणाची सखोल चौकशी करण्‍याची विनंती केली. न्‍यायालयाने प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्‍यास सांगितले आहे.