आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनबियांच्या जांभळांची मजा लुटता येणार, कृषी शास्त्रज्ञांनी तयार केली नवी जात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- बिनबियांची जांभळे ही आता केवळ कल्पना राहिलेली नाही. १० वर्षांच्या संशोधनानंतर उत्तर प्रदेशातील शास्त्रज्ञांनी जांभळाची अशी जात विकसित केली असून आगामी काळात देशभर अशा मऊ आणि बिनबियांच्या जांभळांची मजा लुटता येईल. विशेष म्हणजे औषधी गुणधर्म ठासून भरलेली ही जांभळे आरोग्याला लाभदायक ठरतील.

या जांभळाची जात शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पथकाचे प्रमुख ए. के. सिंह यांनी सांगितले की, १० वर्षांपूर्वी त्यांनी हा प्रकल्प एका विशेष कार्यक्रमांतर्गत हाती घेतला होता. यादरम्यान जांभळाच्या विविध ४० जातींचा अभ्यास करण्यात आला. ही नवीन जात विकसित करताना बिनबियांच्या जांभळाच्या काही जातींचाही अभ्यास करण्यात आला. यात उत्तर प्रदेशातील चंदोली जिल्ह्यात डोंगरी भागात आढळणाऱ्या एका जातीचा समावेश आहे. नवीन जात विकसित करताना याच जातीच्या जांभळाचा वापर करण्यात आला आहे. या जांभळाचे वैशिष्ट म्हणजे यात बी नसल्याने याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेता येते. या जांभळाची असंख्य रोपे लखनौ येथील केंद्रीय संस्थेत तयार करण्यात आली असून ही रोपे लावल्यानंतर पाच ते सहा वर्षांत त्याला फळ येऊ शकेल. या वृक्षाचा आकारही अगदीच मोठा नाही. त्यामुळे त्याचे सहज संगोपन शक्य आहे. शेतांमध्ये, बागेत किंवा रस्त्याच्या कडेलाही सहजपणे याची लागवड करता येणार आहे.
नाव : सीआयएसएचजे-४२
२.५७ सेंटिमीटर या जांभळाची लांबी
२.१८ सेंटिमीटर या जांभळाची जाडी
९७.९ टक्के एका जांभळात गर

मधुमेहींसाठी गुणकारी
बिनबियांची जांभळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी तर अत्यंत गुणकारी ठरणार आहेत. मधुमेहावर मात करण्याची शक्ती असलेले घटक यातत असून अँटी ऑक्सिडंटही खूप आहे. त्यामुळे जांभळे आरोग्यवर्धकही आहेत.

पाच दिवस टिकतील
सर्वसाधारणपणे देशी जांभळे पिकली की लगेच ती मऊ होण्यास प्रारंभ होतो. खातानाही त्याचा हा गुणधर्म लगेच जाणवतो. बिनबियांची जांभळे मात्र साधारण तापमानात किमान चार ते पाच दिवस टिकू शकतील.
बातम्या आणखी आहेत...