आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांच्या हिंसाचारानंतर जमशेदपूरमध्ये कर्फ्यू, कथित छेडछाडीनंतर उडाला भडका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी बंद दरम्यान आंदोलकांनी अनेक वाहने आगीच्या भक्षस्थानी दिली. - Divya Marathi
मंगळवारी बंद दरम्यान आंदोलकांनी अनेक वाहने आगीच्या भक्षस्थानी दिली.
जमशेदपूर (झारखंड) - दोन दिवसांपासून हिंसाचाराने लाल झालेल्या जमशेदपूरमध्ये मंगळवारी संचारबंदी (कर्फ्यू)लागू करण्याती आली आहे. शाळा-कॉलेजांना बुधवारपर्यंत सुटी देण्यात आली आहे. पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या 103 जणांना ताब्यात घेतले असून 150 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण
जमशेदपूरमध्ये कथित छेडछाडीच्या घटनेनंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने मंगळवारी बंदचे आवाहन केले होते. या दरम्यान हिंसाचार भडकला. दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला त्यासोबतच अनेक गाड्यां देखील फोडल्या आणि पेटवून दिल्या. त्यानतंर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लाठीचार्ज केला. जमावावर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या लाठीचार्जनंतर जमावाने ही पोलिसांवर हल्ला केला. त्यात सहा पोलिस अधिकाऱ्यांसह अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले.
सोमवारपासून भडकला हिंसाचार
सोमवारी रात्री साडे नऊ वाजता एका मुलीची काही लोक छेड काढत होते. त्यानंतर दोन समुदायाचे लोक एकमेकांसमोर आले. या प्रकरणी रात्री उशिरा एका मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर हिंसाचार भडकला. दोन्ही सुमदायाच्या लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. त्यानंतरही दगडफेक सुरु होती. काहींनी गाड्या पेटवून दिल्या. संतप्त जमावाला शांत करण्यासाठी डीएसपींनी मॅजिस्ट्रेटकडे हवाई फायरिंगची परवानगी मागितली, मात्र त्याला मंजूरी मिळाली नाही.
पुढील स्लाइडवर पाहा, संबंधीत फोटो
बातम्या आणखी आहेत...