आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Janamashtami Bal Gopal Krishna Birth Celebration Dwarikadhis Temple Mathura

बाळकृष्णाच्या जन्माने मथुरेतील मंदीरात उत्साहाला उधाण, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा - द्वारकाधीश मंदिरात रविवारी मध्यरात्रीपासूनच मथुरा कृष्णाच्या रंगात रंगून गेली आहे. रात्री 11.45 वाजतापासूनच मंदिराचे द्वार खुले करण्यात आले. मंदिराच्या पुजार्‍यांनी सर्वप्रथम श्रीकृष्णाला अभिषेक केला. त्यानंतर दुध आणि दह्याने कृष्णाला न्हाऊ घातले. त्यानंतर श्रृगारासह आरती करण्यात आली आणि कृष्णजन्मोत्सवाला सुरवात झाली.
शंख, ढोल-नगारे, झांज-मंजीरा आणि मृदंगाच्या निनादाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. सगळीकडे, 'जय कन्हैया लाल की, हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की' च्या घोषाणा निनादत होत्या. लाखो भक्त कृष्णाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचत होते. मंदिरात आणि परिसरात भक्तांची गर्दी उसळली.
श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी काही भक्त रेलिंगवर चढले. ज्यांना आत येऊन दर्शन घेणे शक्य झाले नाही त्यांनी मंदिराच्या बाहेर लावण्यात आलेल्या एलसीडी स्क्रिन समोरच नतमस्तक होत श्रीकृष्णाला नमन केले. येथील स्क्रिनवर कृष्णजन्मोत्सवाचा सोहळा लाइव्ह प्रसारित करण्यात आला. रत्नजडीत रेशमी वस्त्रांमधील बालकृष्णाची छबी डोळयात साठवण्यासाठी अनेकांच्या नजरा व्याकूळ झाल्या होत्या. लोक जिथे उभे आहेत तिथून फुलांचा वर्षाव करत होते. त्यामुळे सगळीकडे फुलांचा सडा पडला. 'हरे रामा, हरे कृष्णा' च्या जयघोषात जन्मोत्सव संपन्न झाला.