आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीशकुमारांचाही कोविंद यांना पाठिंबा, अण्णाद्रमुकनेही मोदींच्या विनंतीचा राखला मान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एनडीएच्‍या राष्‍ट्रपतीपदाच्‍या उमेदवाराची घोषणा झाल्‍यानंतर बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी राज्‍यपाल भवनमध्‍ये जाऊन रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन केले होते. - Divya Marathi
एनडीएच्‍या राष्‍ट्रपतीपदाच्‍या उमेदवाराची घोषणा झाल्‍यानंतर बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी राज्‍यपाल भवनमध्‍ये जाऊन रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन केले होते.
पाटणा/नवी दिल्ली - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीच्या प्रयत्नांना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जोरदार झटका दिला. गुरुवारी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीच्या एक दिवसआधीच नितीश यांनी जदयूचा एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे बिहारमध्ये सत्तारूढ महाआघाडीच्या भवितव्याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. 

दरम्यान, अण्णाद्रमुकनेही एनडीए उमेदवार कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पल्लानीस्वामी यांनी बुधवारी ही घोषणा केली. 
 
का दिला पाठिंबा?
- विरोधी पक्षांनी अद्याप एनडीएच्‍या उमेदवाराबद्दल काहीही निर्णय घेतलेला नसताना त्‍यांच्‍यामधील प्रमुख घटक पक्ष असलेल्‍या जेडीयुने मात्र कोविंद यांच्‍या उमेदवारीला पाठिंबा का जाहीर केला? असा प्रश्‍न आता सर्वांना पडत आहे.  
- यावर उत्‍तर देताना पक्षाचे प्रवक्‍ते त्‍यागी म्‍हणाले की, 'बिहारचे राज्‍यपाल म्‍हणून रामनाथ कोविंद यांनी अतिशय चांगले काम केले. विरोधी पक्षाचे राज्‍यपाल असले तर ते राज्‍यसरकारविरोधात किती कारस्‍थाने रचतात, हे सर्वांनाच माहित आहे. ते वेळोवेळी राज्‍य शासनाच्‍या मार्गात अडथळा आणण्‍याचे प्रयत्‍न करतात. मात्र कोविंद याला अपवाद आहेत. त्‍यांनी कधीही वाद होऊ दिला नाही.'
- यापूर्वीही कोविंद यांना राष्‍ट्रपतीपदाचे उमेदवार बनवल्‍याबद्दल आपण व्‍यक्ति‍गतरीत्‍या आनंदी आहोत, असे नितीश कुमार म्‍हणाले होते.
 
नितीश यांनी विरोधी पक्षांना कमकुवत केले, आरजेडीचा आरोप
- विरोधी पक्षांची बैठक होण्‍याची होण्‍यापूर्वीच एनडीएच्‍या उमेदवाराला पाठिंबा देऊन नितीश यांनी विरोधी पक्षांच्‍या एकजुटीला कमकुवत केले, असा आरोप आरजेडीचे (राष्‍ट्रीय जनता दल) नेते विरेंद्र यांनी नितीश कुमारांवर केला.
- ते म्‍हणाले, 'गुरुवारी बैठक झाल्‍यानंतर विरोधी पक्ष आरजेडीबद्दल विचार करतील.'
- लालूप्रसाद यादव यांनी मात्र आपण विरोधी पक्षांसोबतच जाणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. नितीश कुमार यांच्‍या निर्णयाबद्दल काहीही बोलण्‍याचे त्‍यांनी टाळले आहे.    
बातम्या आणखी आहेत...