आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Janata Parivar Merger: Lalu Says, Merger Has Entered Final Stage

लालूंकडून राजदचे जनता परिवारात विलिनीकरण, पाहा त्यांचे निवडक PHOTOS...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रीय जनता दलाचे रविवारी औपचारिकरीत्या जनता परिवारात विलीन झाले. पक्षाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी ही घोषणा केली. संपूर्ण जनता परिवाराच्या विलीनीकरणाची घोषणा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव लवकरच करतील, अशी माहितीही लालूप्रसाद यादव यांनी दिली. मुलायम सिंह हेच आता आमचे नेते असतील असेही लालूंनी सांगितले. मात्र, जनता परिवाराचे नेतृत्व कोणी करावे याचा सामूहिक निर्णय लवकरच होईल असेही लालूंनी स्पष्ट केले. याचाच अर्थ लालूंच्या राजदच्या कंदिलाची जागा आता सायकल घेणार आहे. असे असले तरी मुलायम सिंह हे जेव्हा संपूर्ण जनता परिवाराची घोषणा केव्हा करणार याकडे लक्ष लागले आहे.
बिहारमध्ये पुढील वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाची धुरा नेमकी कोण सांभाळणार, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. बिहारमधून भाजपचा सुफडा साफ करणे हेच आमचे एकमेव लक्ष्य आहे, त्याचसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. "एक झंडा, एक निशाण, भाजप को भगाने के लिए माँग रहा हिंदुस्थान‘ असा नाराही त्यांनी या वेळी दिला. भविष्यात राष्ट्रीय जनता दलाची धुरा आपला मुलगा तेजस्वी यादव हाच सांभाळेल. पक्षाच्या धोरणाविरोधात वक्‍तव्य करणारे पप्पू यादव स्वत:चा वेगळा रस्ता शोधू शकतात, असेही त्यांनी बजावले आहे.
राममनोहर लोहिया यांचे विचारांनी प्रेरित होऊन राजकारणात उडी मारणा-या लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाची स्थापना 5 जुलै 1997 रोजी केली होती. लालू यादव यांनी आपल्या समर्थकांनी सर्वसंमतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले होते. लालूप्रसाद यादव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. ज्या मुलायम सिंहांचे नेतृत्त्व लालूंनी आता स्वीकारले आहे त्या मुलायम यांना पंतप्रधानपदापासून लालूंनी रोखले होते. त्यामुळे या दोघांत एक छुपा अंतर्गत वाद रंगत असे. लालूंना मुलायम करीत व मुलायम लालूंना विरोध करीत असत. आता मात्र, राजकीय व कौटुंबिक परिस्थिती बदलली आहे. लालूंच्या पक्षाला फार चांगले दिवस राहिले नाहीत. अनेक चांगले साथीदार त्यांना सोडून गेले आहेत. अशावेळी चारा घोटाळ्यात दोषी ठरलेल्या लालूंनी मुलायम यांचे नेतृत्त्व स्वीकारले आहे. नियतीनेच त्यांना अशी वेळ आणली आहे.

पुढे पाहा, लालूप्रसाद यांची निवडक छायाचित्रे....