आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Janmasthami Janmbhumi Live Jai Kanhaiya Lal Ki Dwarkadheesh Echoed Jaykaron

श्रीकृष्ण झाले 5240 वर्षांचे; ढोल-नगारे-शंखाचा जन्मभूमीत निनाद, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा (उत्तर प्रदेश) - श्रीकृष्णाच्या जन्मभूमीवर रात्री 12 च्या ठोक्याला जणू साक्षात बाळकृष्णच प्रकट झाले. श्रीकृष्णांने 5241व्या वर्षात पदार्पण केले. यावेळी मंदिर कृष्णाच्या जय जयकाराने निनादले होते. चहू बाजूंनी पुष्पवृष्टी होत होती. ढोल-नगारे, झांज-मंजीरा आणि मृदंगाचा मंगल ध्वरी मंदिरात भरून राहिला होता. येथील प्रत्येकाच्या चेहर्‍यावर बालकृष्णाचे दर्शन झाल्याचा आनंद दिसत होता. रात्री 12.45 वाजतापर्यंत भक्तांनी बाळकृष्णाचे दर्शन घेतले. त्यानंतर विश्रामासाठी मंदिर बंद करण्यात आले.
बाळकृष्णाच्या जन्मसोहळ्यानंतर देवाला पंचामृताने न्हाऊ घालण्यात आले. या पंचामृतामध्येगंगा, यमुनासह देशातील सर्व नद्या आणि समुद्राच्या तीर्थाचा समावेश होता. वस्त्र धारण केल्यानतंर श्रीकृष्णाच्या शरीरावर चंदन आणि तुळशीचा लेप लावण्यात आला. त्यानतंर भगवंताचा श्रृगांर करण्यात आला आणि मग आरती झाली. यावेळी ढोल-नगार्‍यांचा आवाज निनादत होता. बाळकृष्णाला पाग आणि पंजीरीचा नैवेद्य दाखविण्यात आला.
ज्योतिषाचार्य श्यामेश्वर चतुर्वेदी यांनी सांगितले, की श्रीकृष्णाने 5240 वर्षे पूर्ण करत 5241व्या वर्षात प्रवेश केला आहे. द्वापारयुगात श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा जो योग होता, त्यातील बहुतेक शुभसंकेत मध्यरात्री देखील होते. यावेळी मथुरा रोषणाईने न्हाऊन निघाली होती. भक्त कृष्ण भक्तीत तल्लीन होऊन पारंपरिक आणि आधुनिक गीतांवर थिरकत होते.
रिपोर्ट: मुकेश कुमार 'गजेंद्र', सन्मय प्रकाश, अनुराग तिवारी, रवि श्रीवास्तव
फोटो: अविनाश जायसवाल, आशुतोष त्रिपाठी

छायाचित्र - श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर पुजा करताना पुजारी