आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी - जपानी पीएम अॅबे यांच्यात १४ करार, जपान उभारेल बुलेट ट्रेन जाळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -
पानच्या मदतीने मुंबई ते अहमदाबाद मार्गावर पहिल्या बुलेट ट्रेनचे जाळे उभारले जाईल. प्रकल्पावर ९८ हजार कोटी रुपये खर्च होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यात बुलेट रेल्वे, संरक्षण व अणुऊर्जेसह एकूण १४ करार झाले.
दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. यानंतर संयुक्त पत्र परिषदेत मोदी म्हणाले, बुलेट ट्रेनचा करार ऐतिहासिक असून भारतीय रेल्वेत क्रांती येईल. जपानही मेक इन इंडियात वाटा उचलत आहे.

तत्पूर्वी, व्यावसायिकांच्या एका कार्यक्रमात मोदी म्हणाले, भारताला फक्त हायस्पीड रेल्वेच नव्हे तर वेगवान विकासही हवा आहे. जपान प्रथमच भारतातून कार आयात करेल. मारुती सुुझुकी भारतात कारनिर्मिती करून जपानला निर्यात करेल. अॅबे म्हणाले, पंतप्रधान मोदींची आर्थिक धोरणे बुलेट ट्रेनसारखी वेगवान, सुरक्षित, विश्वसनीय आणि लाेकांना एकत्र आणणारी आहेत.
पूजनाचे UPDATES:
@7.10 PM - गंगा आरतीनंतर आबे आणि मोदी हॉटेलात पोहोचले.
@7.00 PM- गंगा आरतीचा समारोप. आबे आणि मोदी यांना स्‍मृतीचिन्‍ह भेट.
@6.30 PM - आबे यांनी मोबाइलमध्‍ये गंगा आरतीचा फोटो घेतला.
@6.18 PM- गंगा आरतीमध्‍ये तीन डमरू, 9 ब्राह्मण आणि 18 देव कन्या सहभागी होत्‍या.
@6.17 PM- शंखनादात गंगेच्‍या आरतीला सुरूवात.
@6.04 PM - आबे आणि मोदी गंगा आरतीसाठी मंचवर.
@6.02 PM -आबे आणि मोदी यांनी गंगेला जल अर्पण केले.
@5.55 PM -दशाश्वमेध घाटावर पूजनाला सुरूवात. आबे भारतीय कपड्यात दिसत आहेत.
@5.50 PM -घाटावर उपस्‍थित लोकांनी हर हर महादेव असा जयघोष केला.
आबे यांनीही केले मोदींचे कौतुक
भारत आणि जपानदरम्यान बुलेट ट्रेन आणि नागरी अणु करार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रदान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत या करारांवर सह्या करण्यात आल्या. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी म्हणाले की, आबे हे त्यांच्या चांगल्या मित्रांपैकी एक आहेत. आबे यांनीही मोदींचे कौतुक केले.

संयुक्त पत्रकार परिषदेतील मोदींचे मत
- भारताच्या आर्थिक विकासात जपानची महत्त्वाची भूमिका आहे. गेल्या वर्षभरात आमच्या नात्यांमध्ये अधिक दृढता आली आहे. जगासाठीही हा एक चांगला संकेत आहेत.
- आम्ही क्लीन एनर्जीच्या क्षेत्रातही एकत्र काम करू इच्छितो. बुलेट ट्रेनमुळे रेल्वे सेक्टरमध्ये एक नवी क्रांती येईल. बुलेट ट्रेनही जपानप्रमाणेच यशस्वी आणि सेफ असेल.
- संरक्षण क्षेत्रात एकमेकांशी सहकार्य वाढवणार आहोत.
- मोदी यांनी ‘साउथ चायना सी’ चे नावही घेतले नाही. पण संकेत दिले की, दोन्ही देश सागरी सुरक्षेच्या मुद्यावरही सोबत असतील. मोदी म्हणाले की जपान 5 वर्षांत भारतात 35 अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल.
बिझनेस समिटमध्ये मोदींवर कौतुकाचा वर्षाव
त्याआधीही शिंजो आबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शनिवारी भारत-जपान बिझनेस समिटदरम्यान आधी मोदी म्हणाले की, भारताला हायस्पीड ट्रेनबरोबरच हायस्पीड ग्रोथ (विकास) देखिल हवी आहे. तर नंतर बोलताना आबे म्हणाले की, मोदी तर पॉलिसीजदेखिल बुलेट ट्रेनच्या वेगानेच लागू करत आहेत.

आबेंनी केले कौतुक...
- मोदींच्या पॉलिसीज हायस्पीड ट्रेनप्रमाणेच सुरक्षित, विश्वसनीय आणि अनेकांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची क्षमता असणाऱ्या आहेत.
- मजबूत भारत हा माझा देश जपानसाठीही फायद्याचा ठरेल. तसेच मजबूत जपान भारतासाठी फायद्याचा आहे.

काय म्हणाले मोदी...
- भारताला केवळ हायस्पीड ट्रेन नाही तर हायस्पीड ग्रोथही हवी आहे.
- जपान भारतातून कार इम्पोर्ट करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बुलेट ट्रेनचा करार आज होण्याची शक्यता
शनिवारी दोन्ही देशांमध्ये बुलेट ट्रेन आणि अणु नागरी करारासह अनेक करार होण्याची शक्यता आहे. आबे पीएम मोदींबरोबर वाराणसीलाही जाणार आहेत. त्याठिकाणी ते गंगा आरतीमध्ये सहभागी होतील.

चर्चेचे मुख्य मुद्दे...
- मोदी आणि आबे बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट्ससाठी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतील.
- भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनबाबतही करार होण्याची शक्यता आहे.
- देशातील पहिल्या बुलेट नेटवर्कवर सुमारे 98000 कोटींचा खर्च होणार आहे.
- पहली बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाददरम्यान धावणार आहे.
- नेव्हीसाठी जपानकडून 12 यूएस-2आय अॅम्फिबियस एअरक्राफ्ट खरेदीची डीलही होऊ शकते. हा करार सुमारे 1.3 अब्ज डॉलरचा असू शकतो.
- कोस्ट गार्डलाही अशी पाच विमाने हवी आहेत. त्यावर दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकते.

वाराणसीमध्ये तयारी सुरू
- मोदी आणि आबे पोहोचण्यापूर्वी वाराणसीमध्ये खास तयारी सुरू आहे.
- गंगा घाटांच्या स्वच्छतेसाठी मुंबईमधून स्टीमार मागवण्यात आले आहेत.
- घाट अधिकाधिक सुंदर दिसावे म्हणून सजावट केली जात आहे.
- गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी जपानला गेले होते तेव्हा दोन्ही देशांमध्ये वाराणसीचा जपानमधील क्योटो शहराच्या पार्श्वभूमीवर विकास करण्याचा करार झाला होता.

मोदी-आबेंचा नियोजित कार्यक्रम
- 12 डिसेंबरला दुपारी 3.30 वाजता वाराणसीला पोहोचणार.
- ताज हॉटेलमध्ये थांबणार, सायंकाळी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन.
- गंगा आरतीमध्ये सहभागी होणार.
- ताज हॉटेलमध्ये खास पाहुण्यांसाठी डीनर.
भारताला जपानची स्पेशल ऑफर
- जपान भारताला 50 वर्षांसाठी 90 हजार कोटींचे कर्ज देईल.
- त्याचा व्याजदर केवळ 0.5 टक्के असेल.
- इतर देशांकडून जपान अशा कर्जासाठी 1.5 टक्के व्याजदर आणि तोही केवळ 25 वर्षांसाठी आकारत असतो.

पीएमओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, व्याजदर आणि कर्ज परतफेडीच्या कालावधीची जी ऑफर दिली आहे ती आपल्यासाठी फायद्याची ठरू शकते. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांदरम्यान संबंध सुधाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत.

आतापर्यंत झालेली चर्चा
जपानच्या ‘जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी’ म्हणजेच जेआयसीएने मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन चालवण्याच्या योजनेचा अभ्यास केला आहे. पहिल्या बुलेट ट्रेनसाठी हा रूट अत्यंत योग्य असल्याचेही या संस्थेने सांगितले. दोन्ही स्टेशनदरम्यानचे अंतर 505 किमी आहे. त्यावर ताशी 200 किमी वेगाने बुलेट ट्रेन चालेल. या प्रोजेक्टवर 98,805 कोटींचा खर्च होईल. हा प्रोजेक्ट 2024 पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे.
शिंकान्शेन आणि आपली बुलेट ट्रेन
- जपानची शिंकान्शेन ही ताशी 320 किमी वेगाने धावते.
- भारतात बुलेट ट्रेन 300 किमी वेगाने धावेल.
- एक प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी 6 ते 7 वर्षे लागतील.
- मोदींच्या सप्टेंबर महिन्यात जपान दौऱ्यामध्ये या प्रोजेक्टबाबत निर्णय झाला होता.
पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित PHOTOS