आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुरथल गँगरेप: ढाब्यावर विवस्त्र आल्या होत्या महिला, लोकांनी दिले कपडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड- आरक्षणाच्या मागणीवरून हरियाणात झालेल्या जाट आंदोलनादरम्यान महिलांवर गॅंगरेप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा चौकशी अहवाल प्रकाशसिंह समितीने सोमवारी हायकोर्टात सादर केला. जाट आंदोलनादरम्यान सोनीपतजवळील मुरथलमध्ये महिलांवर सामूहीक अत्याचार झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, सोनीपतजवळ मुरथल हायवेवर महिलांचे फाटलेले कपडे आढळल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी ही घटना अफवा असल्याचे म्हटले आहे. पीडित महिलांनी समोर येण्याचे पोलिसांनी आवाहनही केले होते.

अनुपम गुप्ता यांनी सांगितले की, आंदोलनदरम्यान झालेल्या हिंसाचारात मुरथलमधील एका ढाब्यावर अनेक युवती व महिला विवस्त्रावस्थेत आल्या होत्या. ढाब्यावरील लोकांना पीडित महिला- युवतींना शरीर झाकण्यासाठी घोंगडी व कपडे दिले. नंतर त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले होते.

चौकशी समितीने नोंदवला होता ढाबा मालकाचा जबाब...
- अनुपम गुप्ता यांनी सांगितले की, हायकोर्टात सादर केलेल्या अहवालात ढाबा मालकाचाही जबाब आहे.
- अहवालात ढाबा मालकाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. प्रकाशसिंग समितीच्या तीन सदस्यांनी ढाबा मालिकाची भेट घेतली होती. यावेळी ढाबा मालकाने महिलांवर अत्याचार झाल्याने सांगितले.
- ढाबा मालिकानुसार, जाट आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात ढाब्यावर काही महिला विवस्त्रावस्थेत आल्या होत्या.

पुढील स्लाइडवर वाचा...
> कसे उघडकीस आले हे प्रकरण...
> हायकोर्ट म्हणाले शेमफूल...
> काय आहे प्रकरण?
> स्थानिकांनी केला पीडित महिलांचे कपडे सापडल्याचा दावा...
>आंदोलनाला लागले होते हिंसक वळण...

बातम्या आणखी आहेत...