आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाट आंदोलन हिंसक : गोळीबारात ३ ठार, ३५ जखमी; १०० वाहने जाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक/ पानिपत - हरियाणामध्ये आरक्षणाच्या मागणीवरून जाट समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाने शुक्रवारी हिंसक रूप धारण केले. रोहतकमध्ये पोलिस आणि आंदोलकांत झालेल्या गोळीबारात ३ जण ठार झाले. पोलिसांसह ३५ हून अधिक जण जखमी झाले. दुसरीकडे भिवानीमध्ये अजय चौटाला पेट्रोल पंप आणि जाट धर्मशाळेला आग लावण्यात आली. जिंद, हिसार, पानिपत, सोनिपत, कॅथल, झज्जर, रोहतक आणि भिवानीमध्ये लष्कर तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंदोलन प्रभावित जिल्ह्यांत मोबाइल, इंटरनेट सेवा, शाळा-महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहेत. २० फेब्रुवारीला होणारी एच-टेट परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

रोहतकमध्ये संतप्त आंदोलकांनी हरियाणाचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू सिंह यांचे घर, भाजप आमदार मनीष ग्रोव्हर आणि आयजी निवासस्थानात घुसून आग लावली. तर दिल्ली रस्त्यावर १०० हून अधिक वाहने, टोल प्लाझा आणि झज्जरमध्ये डिघल टोल, पोलिस चौकी, रोडवेज बस स्टँडवर तीन बसेस व एक मल्टिप्लेक्स जाळून टाकले. रात्री उशिरापर्यंत येथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये थांबून थांबून गोळीबार सुरू होता. सोनिपतमध्ये दिल्ली-चंदीगड मार्गावर आंदोलकांनी लोहमार्ग उखडून टाकला. हिसारमध्ये टोलप्लाझावर तोडफोड, जाळपोळ केली. कॅथलमध्ये दोन किलोमीटर महामार्गावर १५०० हून अधिक झाडे तोडण्यात आली. २००० हून अधिक रोडवेज बसेस आणि दिल्ली, राजस्थान, पंजाब व जम्मूकडे जाणाऱ्या ५५० हून अधिक रेल्वे रोखून धरल्या आहेत. पानिपतहून शताब्दी एक्स्प्रेस चंदीगडला परत पाठवण्यात आली आहे. दरम्यान, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने सरकारला २३ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील स्थितीवर अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

पुढे वाचा.. > १० टक्के आरक्षण देण्याची तयारी
> वादाचे मूळ
> गुजरात : हार्दिकचे तुरुंगात उपोषण