आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jat Community Agitation For Cast Reservation In Haryana

हरियाणा - मंत्री आणि आयजीच्‍या घराला लावली आग, आर्मीला पाचारण केले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंदोलकांनी अर्थ मंत्री, आयजी आणि सर्किट हाउसला आग लावली. - Divya Marathi
आंदोलकांनी अर्थ मंत्री, आयजी आणि सर्किट हाउसला आग लावली.
रोहतक (हरियाणा)- आरक्षणाच्या मागणीवरून जाट समाजाने सुरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यात आंदोलकांनी राज्‍याचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू आणि आयजी यांच्‍या निवासस्‍थानाला आग लावली. दरम्‍यान, परिस्‍थ‍ितीवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी आर्मीला पाचारण करण्‍यात आले असून, गोळीबारात एकाचा मृत्‍यू झाला तर नऊ जखमी झाले.
1.कुठे कुठे झाली हिंसा?
- आंदोलनकांनी शुक्रवार सर्वात अगोदर महर्षी दयानंद विद्यापीठाच्‍या बाहेर डीएसपीच्‍या गाडीवर हल्‍ला चढवला.
- नंतर अॅग्रो मॉलमध्‍ये काही पोलिसांनी बंधक बनवले. पोलिसांनी अतिरिक्‍त तुकडी पाठवून त्‍यांना मुक्‍त केले. दरम्‍यान, पोलिस आणि आंदोलकांमध्‍ये चकमक झाली.
- त्‍या नंतर आंदोलकांनी सर्किट हाउसच्‍या बाहेर असलेल्‍या गांड्यांना आग लावली.
- या ठिकाणी गर्दीतील एकाने देशी कट्टयातून बीएसएफवर गोळी झाडली. त्‍याला प्रत्‍त्‍युतर म्‍हणून बीएसएफच्‍या जवानांनी झाडलेल्‍या गोळीमध्‍ये एका आंदोलकांचा मृत्‍यू झाला.
- त्‍यामुळे खवळलेल्‍या आंदोलकांनी पोलिस महानिरीक्षकांच्‍या निवास स्‍थानाला आग लावून तोडफोड केली.
- नंतर गर्दीने अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्‍या घरावर हल्‍लोबोल करून आग लावली.

पाच दिवसांपासून सुरू होता रास्‍ता रोको, असे भडकले आंदोलन
- आरक्षणाच्‍या मागणीसाठी जाट समुदायाचे लोक पाच दिवसांपासून रास्‍ता रोको आंदोलन करत होते.
- गुरुवारपासून त्‍याला हिंसक वळण मिळाले.
- आरक्षणच्‍या मागणीसाठी धरणे आंदोलक करणाऱ्या वकिलांसोबत एका गैर जाट व्‍यक्‍तीसोबत बाचाबाची झाली. त्‍यानंतर पोलिसांच्‍या उपस्‍थ‍ितीत एकमेकांना खुर्च्या फेकून मारण्‍यात आल्‍या.
- नंतर चिडलेल्‍या आंदोलकांनी रस्‍त्‍यावर उभे असलेले वाहने पेटवून देण्‍यास सुरुवात केली.
आता आर्मीवर भिस्‍त
- परिस्‍थ‍िती पोलिसांच्‍या हाताबाहेर गेली आहे. त्‍यामुळे आर्मीला पाचारण करण्‍यात आल्‍याचे हरियाणाचे डीजीपी यशपाल सिंघल यांनी चंडीगडमध्‍ये पत्रकार परिषदेत सांगितले.
- आठ जिल्‍ह्यांमध्‍ये आर्मीचे जवान तैनात करण्‍यात आले.
- केंद्राने 20 पॅरामिलिट्री फोर्ससुद्धा पाठवल्‍या आहेत. सध्‍या 10 पॅरामिलिट्री फोर्स तैनात आहेत.
इंटरनेट, मोबाइल सेवा बंद
आंदोलनाचे पडसाद रोहतकसह झज्जर व सोनीपत जिल्ल्ह्यातही उमटले आहेत. परिणामी सकारने गुरुवारी रात्रीपासून राज्यातील इंटरनेट व मोबाइल सेवा बंद केली आहे.

सरकारची भूमिका काय? जाट समाजाच्या नेत्याची मागणी काय?
- हरियाणा सरकारने राज्यात पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात केली आहे. दुसरीकडे, मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अाणखी तिव्र करण्‍यात येईल, असा इशारा जाट नेत्यांनी दिला आहे.
- मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर याप्रकरणी शुक्रवारी ऑल पार्टी मीटिंग बोलवण्याची शक्यता आहे.
- सोशल मीडियातून पसरवण्यात येणार्‍या अफवा थांबवण्यासाठी राज्यात इंटरनेट ब्लॉक करण्‍यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
- रोहतकमध्ये मोबाइल सेवा देखील ठप्प झाली आहे.
- 21 फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहे.
- जाट समाजाने आरक्षणाच्या मागणीवरून पाच दिवशीय शांतिपूर्ण चक्का जाम आंदोलन छेडले होते. मात्र, गुरुवारी त्याला हिंसक वळण मिळाले.
- आरक्षणाला पाठिंबा देणारे वकील व एका जाट कार्यकर्त्यासोबत बाचाबाची झाली. काही क्षणात त्याचे रुपांतर हाणामारीत झाली आणि तेथून आंदोलनाला हिंसक वळण लागले.
-शहरात ठिकठिकाणी जाळपोळ सुरु झाली असून पोलिसांच्या वाहनांना लक्ष करण्यात आले आहे.

काय आहे डिमांड?
- ओबीसी कॅटेगरीमध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी जाट समाजाच्या नेत्यांनी केली आहे.
- मात्र, हरियाणा सरकार ही मागणी मान्य करण्यात तयार नाही.
- जाट नेत्यांनी गुरुवारी तब्बल चार तास मुख्यमंत्री खट्टर यांच्याशी चर्चा केली. इकोनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसचा कोटा 10 ते 20 टक्क्याने वाढवण्याचे खट्टर यांनी यावेळी आश्वासन दिले.
- जाट नेत्यांनी मात्र खट्टर याची ऑफर फेटाळली.

पुढील स्लाइडवर पाहा, हरियाणात चिघळलेल्या जाट आंदोलनाचे फोटो...