आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरियाणामध्‍ये पुन्‍हा तणाव: जाट आंदोलकांच्‍या अल्टिमेटमवर मंत्री म्‍हणाले- धमकी देऊ नका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेब्रुवारी महिन्‍यात हरियाणामध्‍ये जाट आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती. - Divya Marathi
फेब्रुवारी महिन्‍यात हरियाणामध्‍ये जाट आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती.
पानीपत - हरियाणामध्‍ये आरक्षणाच्‍या मागणीसाठी जाट समाजाचे आंदोलन तीन आठवड्यानंतर पुन्‍हा एकदा पेटण्‍याची शक्‍यता आहे. जाट समाजबांधवांनी प्रलंबित मागण्‍यांसाठी शासनाला 72 तासांचा अल्टिमेटम दिला होता. गुरूवारी 72 तास संपल्‍यानंतर मंत्री अनिल विज म्‍हणाले की, जाट आरक्षणासाठी आम्‍ही नक्‍कीच बिल पास करू, मात्र सरकारला धमक्‍या देणे बंद करा. हरियाणाने केंद्राला मागितली पॅरामिलिट्री फोर्स..
- हरियाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव(गृह) पी.के.दास म्‍हणाले की, जाट आंदोलक काही ठिकाणी एकत्र येऊ शकतात, अशी माहिती आम्‍हाला मिळालेली आहे.
- रोहतकचे एसएसपी शशांक आनंद म्‍हणाले, अफवांना थांबवण्‍यासाठी गरज भासल्‍यास आम्‍ही पुन्‍हा एकदा इंटरनेट सेवा बंद करू.
- जाट आरक्षणासंदर्भातील बिल हरियाणा विधानसभेत गुरुवारी सादर होईल, अशी आशा होती.
- जाट समाजाच्‍या अल्टिमेटमवर हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी एएनआय ला सांगितले, आम्‍ही नक्कीच आरक्षणासाठी बिल आणू. जाट समाजाला सांगू इच्‍छितो की, कृपया त्‍यांनी धमक्‍या देणे बंद करावे.
- जाट समाजाने आंदोलन पुन्‍हा एकदा पेटण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.
- शासनाने संपूर्ण प्रदेशात सुरक्षा वाढवण्‍याचा आदेश दिला आहे.
- उपायुक्तांना 2 महिन्‍यांसाठी राष्‍ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत थेट कारवाईचा अधिकार दिला.
- सुरक्षेसाठी केंद्राकडून पॅरामिलिट्री फोर्सची मागणी केली आहे. रोहतकमध्‍ये आर्मी आणि पॅरामिलिट्रीचे पथकं पोहोचले आहेत.
- येथे तीन दिवस एहतियातन यूनिवर्सिटी आणि कॉलेजेस बंद केले आहेत.
- मुख्‍यमंत्री मनोहरलाल खट्टर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याशी चर्चा करणार आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, आंदोलनाशी संबंधित फोटो..