आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jat Quota Stir Continues Haryana Army Uses Chopper To Reach Rohtak

जाट आंदोलन पेटले: 10 PHOTOS मधून पाहा धूमसत असलेले हरियाणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणात दुसर्‍या दिवशीही हिंसा सुरुच आहे. - Divya Marathi
हरियाणात दुसर्‍या दिवशीही हिंसा सुरुच आहे.
पानीपत- हरियाणात शांततेच्या मार्गाने सुरु झालेल्या जाट आंदोलनाला सहावे दिवशी हिंसक वळण लागले. दगडफेक, जाळपोळमुळे संपूर्ण राज्य धूमसत आहे. जाळपोळचे लोण आता देशाची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. राज्यात अराजकतेसारखी स्थिती निर्माण झाली आहे.

रोहतक, सोनीपत, पानीपत, हिसार, जींद, भिवानी, रेवाडी, झज्जर, फरीदाबाद, करनाल, फतेहाबाद व सिरसासह जवळपास 15 जिल्हात तणावपूर्ण स्थिती आहे. काही जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्‍यात आली आहे. रोहतक व हिसारमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. जाट आंदोलन रोखण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी मनोहलाल खट्टर यांचे सरकार सबशेल अपयशी ठरले आहे.

राज्यातील 920 पेक्षा जास्त मार्गावरील बससेवा ठप्प आहे. रोहतक-दिल्ली-हिसार, रेवाडी-हिसार-दिल्ली, पानीपत-रोहतक मार्गावरील 500 रेल्वे गाड्या रद्द करण्‍यात अाल्या आहेत. राज्यात जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा जाणवू लागल्याचे वृत्त आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, धूमसत असलेले हरियाणातील वस्तुस्थिती...