आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलखोरांनी भस्मसात केले विधवेचे हॉटेल, जाट समितीच्या मदतीने पुन्हा झाले सुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - जाट आरक्षण आंदोलनादरम्यान दंगलखोरांनी रोहतकच्या एका विधवेचे हॉटेल आगीच्या भक्षस्थानी दिले होते, या निराधार महिलेच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. चंदीगडची जाट समितीने महिलेले हॉटेल पुन्हा पहिल्यासारखे करुन देण्यासाठी मदत केली आहे. समितीने फ्रिज, ज्यूसर, फर्निचर, भाजी-पाला आणि भांडी भेट दिली आहेत, यामुळे विधवा महिलाने उदरनिर्वाहाचे साधन असलेले हॉटेल पुन्हा सुरु केले आहे.
दोन मुलींची विधवा आई चालवते 'ढाबा'
- जातीय दंगलीच्या आगीत भस्मसात झालेले हॉटेल पाहून दोन मुलींची विधवा आई ओक्साबोक्सी रडली होती. मात्र महिलेने हिंमत न हारता हॉटेल पुन्हा सुरु केल्याची दैनिक भास्करमध्ये प्रकाशित बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चंदीगडच्या जाट सेवा समितीने मदतीचा हात पुढे करून सद्भावनेचा आदर्श निर्माण केला आहे.
- समितीच्या सदस्यांनी राज्यातील दुसऱ्या पीडितेचीही मदत करणार असल्याचे सांगितले. जातीय दंगलीमुळे एकमेकांबद्दल वाढलेल्या कडवटपणात हा स्तुत्य उपक्रम असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
- गांधी कँप येथील चंचल या पती निधनानंतर हॉटेलच्या उत्पन्नातून दोन मुलींचे संगोपन करत होत्या, मात्र 19 फेब्रुवारी रोजी झालेल्या लुटालूटीत त्यांचे हॉटेल जाळण्यात आले. यामुळे त्यांच्यासमोर आता कसं जगायचं ? हा मोठे संकट निर्माण झाले होते. सरकारने केलेल्या सर्वेक्षणात त्यांनी पाच लाख रुपये मदतीची मागणी केली आहे.
- दंगलखोरांनी जाळलेल्या हॉटेलचे फोटो आणि बातमी सोशल मीडियावर पाहिल्यानंतर चंदीगडच्या जाट सेवा समितीने तातडीची बैठक बोलावून मदत करण्याचा निर्णय घेतला. तीन दिवसांपूर्वी समितीचे संचालक सुभाष बैनीवाल आणि व्यवस्थापक प्रा. महासिंह यांनी चंचल यांची भेट घेऊन त्यांच्या हॉटेलच्या झालेल्या नुकसानीची पाहाणी केली. त्यानंतर त्यांनी तातडीने गरजेच्या वस्तू खरेदी करुन हॉटेलमध्ये आणून दिल्या आणि कोणताही औपचारिक कार्यक्रम न घेता महिलेच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या हॉटेलचे उद्घाटन केले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दंगलीत जळालेले हॉटेल आणि जाट समितीने केलेली मदत
बातम्या आणखी आहेत...