आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीपेक्षा वेगळे आहे जावेद यांचे मत, म्हणाले- देशात कुठे दिसते असहिष्णुता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीगड (उत्तर प्रदेश) - बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांनी काही दिवसांपूर्वी देशातील वाढत्या असहिष्णुतेवर म्हटले होते, की धर्माच्या नावाने ओळखले जाण्याचा प्रकार वाढला आहे. मात्र शबाना आझमी यांचे पती प्रसिद्ध शायर आणि गीतकार जावेद अख्तर यांचे मत पत्नीपेक्षा वेगळे असल्याचे दिसते. एका कार्यक्रमात जावेद अख्तर म्हणाले, 'असहिष्णुतेच्या नावावर वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र वास्तवात असहिष्णुतेसारखे काहीच नाही. मला या वातावरणात कधीही भय वाटले नाही.' बुधवारी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या महिला महाविद्यालयात आयोजित सेमिनारमध्ये अख्तर बोलत होते.

ते म्हणाले, 'असहिष्णुतेच्या नावावर भलेही देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असला तरी, वास्तवात असहिष्णुतेसारखे काही नाही. मला तर कधीही या वातावरणात भीती वाटलेली नाही.' जावेद अख्तर म्हणाले, देशाची खरी ताकद शांतता, सद्भाव आणि मैत्री आहे. येथे असहिष्णुतेची लाट आली तरी ती परत जाते.

आमिर खानच्या वक्तव्यावर म्हणाले, आमिरच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला. आमिर कधीही म्हटला नाही की देश सोडून जात आहे. तो फक्त एवढेच म्हणाला की पत्नी किरणचे बोलणे ऐकून मला धक्का बसला.

जावेद अख्तर म्हणाले, 'आमिर खान मौलाना आझाद यांच्या कुटुंबाचा वंशज आहे. ज्या व्यक्तीने समाज सुधारणेसाठी एवढे कष्ट उपसले, त्यांच्याकडे असे शंकेच्या नजरेने पाहाता कामा नये.'

काय म्हणाल्या होत्या शबाना आझमी
मागील आठवड्यात शनिवारी लखनऊ लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये शबाना आझमी म्हणाल्या होत्या, '1992 मध्ये मला प्रथम या गोष्टीची जाणिव झाली की मी मुस्लिम आहे. प्रत्येक जण म्हणत होता - ओह, तुम्ही मुस्लिम आहात.'

काय आहे असहिष्णुतेचा मुद्दा
- उत्तर प्रदेशातील दादरी येथे गोमांस घरात ठेवण्याचा संशयाने अखलाक नावाच्या एका व्यक्तीची ठेचून हत्या करण्यात आली होती.
- हरियाणामध्ये एका दलित कुटुंबाची जाळून हत्या करण्याचा प्रयत्न झाला त्यात दोन चिमुकले मेणबत्ती जळावी तसे भाजले होते.
- कन्नड लेखक कलबुर्गी यांचा त्यांच्या घरात घुसून खून करण्यात आला.
या घटनांनंतर देशात असहिष्णुतेचा मुद्दा पेटला. अनेकांनी याविरोधात पुरस्कार परत केले. या पुरस्कार वापसीत अनेक लेखक, चित्रपट निर्माते आणि शास्त्रज्ञांचा समावेश होता. अभिनेता आमिर खान, शाहरुख खान आणि ख्यातकिर्त लेखिका अरुंधती रॉय यांच्यासारख्या व्यक्तींनी या मुद्यावर वक्तव्य करुन चर्चेत राहिले होते.