आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाफरींचा अर्ज रद्द होण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - आम आदमी पार्टीला त्यांच्या राजकीय अपरिपक्वतेची किंमत मोजावी लागत आहे. पार्टीने लखनऊ येथून दोन उमेदवारांचे अर्ज भरले आहे. आपचे उमेदवार जावेद जाफरी यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे. आपने त्यांचे अलाहाबाद येथील उमेदवार आदर्श शास्त्री यांना लखनऊमधूनही अर्ज भरण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे शास्त्री यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. जाफरी यांच्या नावाची नोंद मतदार यादीत असण्यावरून काही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द होण्याचा धोका आहे.

नवरदेवालाही ‘आप’ची टोपी
हिस्सार. निवडणुकीचा माहोल आता जनमानसात भिनला आहे. नेते व त्यांचे सर्मथक यथाशक्ती प्रचाराचे सर्व पर्याय वापरत आहेत. हरियाणातील सिरसा येथे आम आदमी पार्टीच्या सर्मथकाने नवीच पद्धत अवलंबली आहे. मुकेश धंजू यांनी आपल्या लग्नात सेहरा तर घातला. त्या सेहरावरही त्यांनी आपची टोपी घातली. त्यांच्या मित्रांनीही आपची टोपी घातली. महिलांनीही याचे अनुकरण करत ‘आप’ला आपलेसे केले. नवरदेव मुकेश ‘आप’च्या विचारधारेने प्रेरित आहेत.