आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरुंचे जन्मस्थळ बनले \'रेड लाइट एरिया\'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा आज (14 नोव्हेंबर) जन्मदिन आहे. नेहरूंचा जन्म अलाहाबाद येथील मीरगंज मोहल्ल्यात झाला होता. त्या काळात हा भाग उच्चभ्रू समजला जात होता. मात्र, आज मीरगंज मोहल्ल्याचे रुपांतर एका वेश्यावस्तीत झाले आहे. विशेष म्हणजे मीरगंज मोहल्ला हा राज्यातील सगळ्यात मोठा रेड लाइट एरिया म्हणून ओळखला जातो.

ब्रिटिशांनी मीरगंज परिसर खास मनोरंजनासाठी तयार केला होता. ते या भागात वेश्यालये सुरु करणार होते आणि ते गेल्यानंतरही येथे मोठा वेश्या व्यवसाय खुले आम सुरु आहे.

जवाहरलाल नेहरु यांचे वडील मोतीलाल नेहरु हे वकील होते. सिव्हिल लाइन्समधील 9 एल्गिन रोडवर त्यांनी भाड्याने एक बंगला घेतला होता. त्यानंतर संपूर्ण नेहरु कुटूंब याच बंगल्यात राहत होते. येथेच पंडीत नेहरुंचा जन्म झाला होता.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून छायाचित्रांतून पाहा मीरगंज मोहल्ल्याची झलक!