आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल वापरू दिला नाही म्हणून जवानाने केली मेजरची हत्या; उरी सेक्टरमधील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- मोबाइलचा वापर करू देण्यास नकार दिल्यामुळे एका जवानाने मेजर शिखर थापा यांची  गोळी झाडून हत्या केल्याची घटना जम्मू- काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये घडली. ही घटना सोमवार रात्रीची आहे. 

मेजर थापा रात्री अकराच्या सुमारास उडीच्या बूचर पोस्टवर गस्तीला गेले होते. त्या वेळी नायक काथी रेसन ड्यूटीवेळी मोबाइलचा वापर करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ते रेसनवर रागावले आणि संबंधीत अधिकाऱ्याकडे तक्रार करण्याचा त्यांनी इशारा दिला. दरम्यान, त्यांनी रेसनकडून मोबाइल घेण्याचा प्रयत्न केला. पण, रेसन यांनी तो देण्यास नकार दिला. त्या दरम्यान त्यांच्यात झालेल्या बाचाबाचीत मोबाइल खाली पडला आणि त्याची स्क्रिन फुटली. त्यामुळे रागावलेल्या रेसनने त्याच्या एके-४७ रायफलमधून थेट मेजरवरच गोळी झाडली. नंतर मेजरला लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

नायक काथी रेसन १९ मद्रास रेजिमेंटचा जवान आहे. तर मेजर शिखर थापा हे लष्कराच्या ७१ शस्त्रधारी रेजिमेंटशी संबंधीत होते. २०१५ पासून ते ८ राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते. मुळचे हिमाचल प्रदेशातील धर्मशाळाचे रहिवाशी असलेले थापा हे २०११ मध्येच लष्करात रुजू झाले होते. २०१५ मध्ये त्यांचा विवाह झाला आणि यंदा एप्रिलमध्येच त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्यांच्या पश्चात सध्या त्यांच्या कुटुंबात पत्नी सुविधा आणि मुलगा सुवीर थाप आहे. 

२०१४ मध्ये जवानाने चार सहकाऱ्यांवर झाडल्या होत्या गोळ्या
यापूर्वी २०१४ मध्ये जम्मू-काश्मिरातील गांदरबलच्या लष्करी तळावर एका जवानाने त्याच्या चार सहकाऱ्यांची गोळी झाडून हत्या केली होती. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. तो १३ राष्ट्रीय रायफल तुकडीचा जवान होता आणि मनसाबलमध्ये तैनात होता.
बातम्या आणखी आहेत...