आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगाम एन्काऊंटरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान, आर्मीचा जवानही शहीद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुलगाम - आर्मीने नौबग कुंडमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या एन्काऊंटरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. फायरींगमध्ये एका जवानाला गोळी लागली होती, तो हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शहीद झाला. दुसरीकडे फोर्सेस पुलवामामध्येही घुसखोरीच्या विरोधात ऑपरेशन राबवत आहेत. काश्मीरमध्ये सुमारे वर्षभरापासून सिक्युरिटी फोर्सेस ऑपरेशन ब्लॅक आउट राबवत आहेत. सिक्युरिटी फोर्सेसने यावर्षी ऑक्टोबरपर्यंत 168 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. 

पुलवामातही एन्काऊंटर, दहशतवाद्यांच्या तळाबाबत मिळाली माहिती 
- नौबग कुंडमध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर आर्मीने येथे सर्च ऑपरेशन राबवले. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर फायरींग सुरू केले. अजूनही एन्काऊंटर सुरू आहे. 
- पुलवामामध्ये देखिल लाम गावाजवळ पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये एन्काऊंटर झाले. वका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांच्या तळांची माहिती मिळाली आहे. सध्यादेखिल सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. 
 
3 वर्षांत 183 जवान शहीद
नोयडाचे आरटीआय अॅक्टीव्हीस्ट रंजन तोमर यांच्या एका अर्जावर गृह मंत्रालयाने नुकतेच उत्तर दिले होते. त्यात गेल्या तीन वर्षांत काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांत 183 जवान शहीद झाले होते, अशी माहिती मिळाली आहे. त्याशिवाय 62 नागरिकही मारले गेले. हा आकडा आंकडा मे 2014 पासून मे 2017 पर्यंतचा आहे.

काश्मीरमध्ये 275 दहशतवादी अॅक्टीव्ह
न्यूज एजन्सीने काही दिवसांपूर्वी सुत्रांच्या हवाल्याने म्हटले होते की, काश्मिरमध्ये सुमारे 275 दहशतवादी अॅक्टीव्ह आहेत. त्यापैकी 250 फक्त पीर पंजाल रेंजमध्ये आहेत. 2017 मध्ये आतापर्यंत 291 दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी 80 यशस्वीही झाले.
बातम्या आणखी आहेत...