जम्मू - सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर निशात साधत आज (बुधवार) दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात चार जवानांसह आठ जण जखमी झालेत. ही घटना अनंतनाग-पहलगाम मार्गावर घडली. हा रस्ता अमरनाथकडे जातो. घटनास्थळी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या राखीव तुकड्या पोहोचल्या आहेत. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
पंजामधील गुरदासपूरमध्ये सोमवारी झालेल्या हल्ल्यानंतर अमरनाथला जाणा-या भाविकांवरही हल्ला होईल, अशी शंका व्यक्त गेली जात होती. ती खरी ठरली. दरम्यान, यात कुणी भाविक जखमी झाला की नाही, याची माहिती मिळाली नाही. अनंतनागमध्ये चारच दिवसांपूर्वी 25 जुलैला दहतवाद्यांनी ग्रेनेड फेकले होते. त्यात एका आयईसक्रीम वेंडरचा मृत्यू झाला होता तर पाच जण जखमी झाले होते.
संबंधित फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...