आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयललिता आज सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता, पाहा 15 मिनटांत कसा पलटला निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : जयललितांना जामीन नाकारल्याने चेन्नईच्या एका रेस्तरॉमध्ये समर्थकांनी तोडफोड केली.
 
चेन्नई/बेंगळुरू - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या जयललिता यांचा जामीन अर्ज कर्नाटक हाई कोर्टाने फेटाळून लावला. त्यानंतर बुधवारी जयललितांचे वकील राम जेठमलानी सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.

सरकारी वकीलही सशर्त जामीनासाठी तयार झाले होते. तरीही जयललितांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. जस्टीस एव्ही चंद्रशेखर म्हणाले की, भ्रष्टाचाराला गांभीर्याने घेणे गरजेचे असते. कारण भ्रष्टाचारामुळे समाजात आर्थिक असमानता पसरत असते. तसेच मानवाधिकारांचेही उल्लंघन होते. त्यामुळे जयललितांना आता जामीन फेटाळला जाऊ शकत नाही.
 
पाहा, 15 मिनिटांत पलटला निर्णय
सायंकाळी 4.00 : कोर्टाने जामीन देण्यास नकार दिला. हे वृत्त पसरतात जयललितांच्या समर्थकांनी आंदोलन सुरू केले. विविध ठिकाणी धरणे आंदोलने सुरू केली.
सायंकाळी 3.45 : जयललितांचे वकील राम जेठमलानी यांनी कोर्टाच्या बाहेर सरकारी वकील सशर्त जामीनासाठी राजी असल्याचे सांगितले. त्यानंतर जामीन मिळणार असेच ग्राह्य धरले जात होते. त्यानंतर जयललितांचे समर्थक पेढे वाटत होते.
 
अशी पसरली अफवा
समर्थकांच्या अति उत्साहामुळे जयललितांना जामीन मिळाल्याची अफवा पसरली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टात जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा सरकारी पक्षाच्या वतीने सशर्त जामीनावर आक्षेप घेण्यात आला नाही. त्यानंतर समर्थकांनी लगेचच असे समजून घेतले की जामीन मंजूर झाला आहे. मात्र कोर्टाने अर्ज फेटाळला होता.
 
पुढे पाहा, जयललितांच्या समर्थनात लावलेले वादग्रस्त पोस्टर आणि सामसूम असलेल्या बाजारपेठा...