आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayalalita Made Alliance With CPI, Big Shock To Narendra Modi

भाकपपाठोपाठ माकपशी जयललिता यांची आघाडी, नरेंद्र मोदींसाठी मोठा धक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाने भाकपपाठोपाठ माकपशीही युती केली आहे. पक्षाच्या प्रमुख व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी सोमवारी तशी घोषणा केली. दोन दृष्टिकोनांतून या आघाडीला वेगळेच महत्त्व आहे. एक म्हणजे पाठिंब्याच्या आशेवर असलेले भाजप व नरेंद्र मोदींसाठी हा मोठा धक्का आहे. दुसरे म्हणजे यातून बिगर काँग्रेस व बिगर भाजप आघाडी तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांच्यासोबतच्या बैठकीनंतर आघाडीची घोषणा करताना अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता म्हणाल्या की, लोकसभेची निवडणूक आम्ही एकजुटीने लढवणार आहोत. यातून मोठे यश मिळण्याची आम्हाला आशा आहे. पुढचा पंतप्रधान कोण असेल यावर जललिता म्हणाल्या की, त्यावर चर्चा करण्यासाठी ही योग्य वेळ नाही. निवडणुकीनंतरच असा प्रश्न विचारणे अधिक चांगले ठरेल. तिसर्‍या आघाडीच्या मुद्दय़ावर करात यांनी म्हटले आहे की, अनेक पक्षांशी आमची चर्चा सुरू असून, काही दिवसांतच याबाबत निर्णय घेतला जाईल.
39 पैकी 24 जागा मिळण्याचा अंदाज : तामिळनाडूत लोकसभेच्या 39 जागा आहेत. अलीकडेच झालेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात अण्णाद्रमुकची स्थिती सध्या चांगलीच भक्कम असल्याचे स्पष्ट झाले होते. एबीपी न्यूजने पक्षाला 24 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. विद्यमान लोकसभेत या पक्षाचे फक्त नऊ खासदार आहेत.
भाजपसाठी युती धक्का
गतवर्षी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची तिस-यांदा शपथ घेतली. त्या वेळी जयललिताही उपस्थित होत्या. सहकार्याचे स्पष्ट संकेत त्यातून मिळाले होते. परंतु वर्षभरात परिस्थिती बदलली आहे. रालोआचे कडबोळे वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असतानाच भाजपने एमडीएमकेशी आघाडी केली आहे. परंतु जयललिता डाव्या पक्षांसोबत गेल्याने पक्षाच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.