आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्रमुकमधील भाऊबंदकी जयललितांच्या पथ्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - 24 एप्रिलला होणार्‍या मतदानाच्या प्रचार मोहिमेला तामिळनाडूत वेग आला आहे. राष्ट्रीय मुद्यांपेक्षा राज्यातील प्रश्नांवर प्रचारादरम्यान भर दिला जात आहे. मुख्यमंत्री जयललिता यांच्या पक्षाच्या प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू असून राजकीय अनागोंदीचा पुरेपूर फायदा करून घेण्याचा अण्णाद्रमुकचा पवित्रा आहे. करुणानिधींच्या द्रमुक या प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षातील भाऊबंदकीचा फायदा जयललितांचा पक्ष घेत आहे.करुणानिधी यांनी आपले धाकटे पुत्र एम.के.स्टॅलिन यांना वारसदार घोषित केले व बंडखोर ज्येष्ठ पुत्र अलागिरी यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.तिकीट वाटपातही स्टॅलिन यांचेच वर्चस्व असून त्यामुळे त्यांची बहीण व खासदार कनिमोळी दुखावल्या आहेत. स्टॅलिनमुळे दुखावलेले कनिमोळी व अलागिरी आता एकत्र येणार आहे. अलागिरी यांनी गुरुवारी कनिमोळी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.बहीण-भावाने सुमारे तासभर चर्चा केली. त्यामुळे द्रमुकला नुकसान होण्याची शक्यता आहे.