आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jayalalitha News In Marathi, Chief Minister, Tamil Nadu, M.Karunanidhi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तामिळनाडूच्या 1200 कोटींच्या विधानसभेचे रुग्णालयात रूपांतर, जयललिता यांचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तामिळनाडूच्या नव्या विधानसभेच्या भव्य वास्तूत रुग्णालय थाटण्यात आले आहे. आठव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांचे आलिशान दालन रुग्णालयाच्या संचालकांना मिळाले आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात हृदयाच्या शस्त्रक्रिया होत आहेत. पाचव्या मजल्यावर अन्य कॅबिनेट मंत्री व त्यांच्या सचिवांच्या कार्यालयात मेंदू व मूत्रपिंड विभाग उघडण्यात आला आहे. तळमजल्यात सर्वात मोठ्या सेंट्रल हॉलमध्ये थायरॉइडच्या डॉक्टरांचा राष्‍ट्रीय परिसंवाद होत आहे. तीन वर्षे आणि 1200 कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या विधानसभेत 400 खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल थाटण्यात आले आहे. त्यासाठी आणखी दोन वर्षे आणि 200 कोटी रुपये खर्ची घालावे लागले.

2003 मध्ये मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात जयललिता यांना विधानसभेच्या नव्या वास्तूची कल्पना सुचली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2006 मध्ये करुणानिधी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सरकारी जमिनीवर ही वास्तू उभारली. आपला ड्रीम प्रोजेक्ट करुणानिधी यांनी पूर्ण केल्याची बाब जयललिता यांना खटकली. त्यामुळे 2011 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी विधानसभेचे रुग्णालयात रूपांतर करण्याचा आदेश दिला.
त्याआधी मार्च 2010 मध्ये त्याचे उद्घाटन झाले आणि विधानसभेची दोन अधिवेशनेही पार पडली. या पार्श्वभूमीवर द्रमुक प्रवक्ते टी. के. एस. एलगोवन म्हणाले, हा निर्णय राजकीय सूडबुद्धीतून घेण्यात आला आहे. असेच रुग्णालय 500 एकरात स्वतंत्र बनवता आले असते. लोकांच्या पैशाचा हा अपव्यय आहे. आम्ही निर्णयाविरोधात न्यायालयात गेलो होतो. मात्र, सरकारचा धोरणात्मक निर्णय ग्राह्य धरण्यात आला. चेन्नईमध्ये तीन सरकारी महाविद्यालयांशी संबंधित मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत.

अण्णा लायब्ररी वाचली
करुणानिधी यांनी नव्या विधानसभेजवळील अण्णा विद्यापीठानजीक 200 कोटी रुपये खर्चाचे सहा मजली ग्रंथालय उभे केले होते. या ठिकाणी पाच लाखांहून जास्त पुस्तके आहेत. जयललिता यांनी त्याचीही हायटेक बाल रुग्णालयात रूपांतर करण्याची योजना आखली होती. मात्र, विविध पक्ष-संघटनांच्या विरोधामुळे निर्णय रखडला.

पुढे वाचा....