आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकाता - एरवी राजकारणात काय होईल याचा कधीच अंदाज बांधता येत नाही. त्याचाच प्रत्यय लोकसभेच्या तोंडावर येऊ लागला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मैत्रीचा हात पुढे करताच अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी त्याला प्रतिसाद देताना शुक्रवारी निवडणुकीबाबत चर्चा केली.
दोन्ही नेत्यांमध्ये शुक्रवारी फोनवरून ही चर्चा झाली. सकाळी जयललिता यांनी बॅनर्जींना फोन करून लोकसभा निवडणुकीबाबतचा आपला दृष्टिकोन मांडला. दोघींमधील संभाषणाचा तपशील समजू शकला नाही. जयललिता किंवा मायावती यांच्यासोबत काम करण्यास आपली काहीच हरकत नाही. निवडणुकीनंतर त्या पंतप्रधान झाल्यानंतरही आपण त्यांच्यासोबत राहू. मला काळजी जनतेची वाटते. इतर कोणत्याही व्यक्तीची नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी गुरुवारीच स्पष्ट केले होते. फेसबुकवरील टॉक्स लाइव्ह कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका मांडली होती. जयललिता आणि ममता बॅनर्जी या आपापल्या राज्यातील प्रभावी नेत्या आहेत. त्यामुळे दोघी निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येणार असतील तर दोन्ही राज्यांतील निकालावर त्याचा परिणाम मोठा परिणाम होऊ शकतो. पश्चिम बंगालमध्ये 42 आणि तामिळनाडूत 39 एवढ्या लोकसभेच्या जागा आहेत. तामिळनाडूमध्ये डावे पक्ष आघाडीतून बाहेर पडले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.