आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिरव्या रंगाच्या लकी साडीत अम्मांनी घेतली पुन्हा सूत्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तामिळनाडूत शनिवारी जयललिता यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. २८ मंत्र्यांसह जयललिता यांचा हा सोहळा पार पडला. जयललिता यांच्या समर्थकांचा उत्साह सोहळ्याच्या निमित्ताने पाहण्याजोगा होता. गडद हिरव्या रंगाची साडी परिधान करून आलेल्या अम्मांचे दर्शन घेण्यासाठी चढाआेढ लागली होती. अम्माही कधी हसून कधी निर्विकारपणे आपल्या चाहत्यांना प्रतिसाद देत होत्या.

६७ वर्षीय जयललिता यांनी शुक्रवारी आठ महिन्यांच्या खंडानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावली होती. त्यांची विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा मार्ग खुला झाला. जयललिता यांच्यासाठी हिरवा रंग लकी मानला जातो. चमकदार हिरव्या रंगातील साडीबरोबरच व्यासपीठाच्या मागील पडदादेखील हिरव्याच रंगाचा होता.

शपथविधीनंतर जयललिता यांचे अभिनंदन करण्यासाठी आलेले पाहुणे आणि कार्यकर्ते त्यांना हिरव्या कपड्याचे आवरण असलेला पुष्पगुच्छ भेट देत होते. एवढेच नव्हे तर जयललिता यांनी शपथविधीनंतर हिरव्या पेननेच स्वाक्षरीदेखील केली. त्यांची कर्णफुले, बोटातील अंगठीतील रत्नदेखील हिरव्या रंगाचे होता. त्यांचे निकटवर्तीय सहकारी शशिकला यांच्या अंगावरील संपूर्ण कपडे हिरव्या रंगाचे होते. महिला कार्यकर्त्यांनीदेखील हिरव्या रंगाच्या साड्या परिधान करून समारंभाला हजेरी लावली होती.