आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayalalitha Today File Bail Form In Karnatka High Court, Divya Marathi

अम्मांसाठी वकिलांची फौज, कर्नाटक उच्च न्यायालयात आज अर्ज दाखल करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई/बंगळुरू - बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगात असलेल्या अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करतील. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी विशेष न्यायालयाने ठोठावलेल्या ४ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचे वकील प्रयत्न करत आहेत. यदाकदाचित शिक्षेला स्थगिती मिळाली तरी त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार मात्र कायम राहणार आहे.

अ‍ॅड. बी. कुमार यांनी सोमवारी जामीन अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, याची सुनावणी मंगळवारीच होण्याची शक्यता आहे. कारण उच्च न्यायालयालयास २९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर नवरात्रानिमित्त सुट्या असून या अर्जावर सुटीच्या न्यायालयातच सुनावणी होऊ शकेल. तुरुंग परिसरात जमावबंदी आदेश आहेत. तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी असल्याने त्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. त्यामुळे तुरुंगात आणि बाहेर प्रचंड सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तुरुंगाच्या ५ किमी परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. शनिवारी विशेष न्यायालयाने शिक्षा जाहीर करताच जयललितांना पोिलसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी बराकीत नेले होते.

...आमदारकी वाचू शकेल ?
जयललितांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती मिळवण्याचाही वकिलांचा प्रयत्न आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत सहसा वरिष्ठ न्यायालये शिक्षेला स्थगिती देत नाहीत, तरीही या प्रकरणात स्थगिती मिळवण्यात यश आले तर जयललितांची आमदारकी तात्पुरती का होईना वाचू शकेल.

तुरुंगात घेतले साधे जेवण!
परपन्ना अग्रहरा मध्यवर्ती तुरुंगात असलेल्या जयलिलता यांना शनिवारी इतर कैद्यांप्रमाणे साधे जेवण देण्यात आले. भात, सांबर, दही आणि लोणचे त्यांना देण्यात आले. जयललिता यांना तुरुंगाच्या महिला विभागात खास बराकीत ठेवण्यात आले आहे.